Murdi Khandepar News: बंधाऱ्याविरोधात ग्रामस्थांची थेट पंचायतीवर धडक, कार्यवाही न केल्यास न्यायालयात जाण्याचा इशारा

मुर्डी-खांडेपारवासीय आक्रमक : पंचायत मंडळाची उडाली तारांबळ
Murdi Khandepar News
Murdi Khandepar NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Murdi Khandepar News तीव्र विरोध असतानाही सरकारने दंडेलशाहीने बंधारा बांधकामाला सुरवात केल्याने संतप्त मुर्डी-खांडेपारवासीयांनी आज (गुरुवारी) कुर्टी-खांडेपार पंचायत कार्यालयावर धडक दिली. लोकांच्या आक्रमकतेमुळे पंचायत मंडळाची तारांबळ उडाली.

यावेळी ग्रामस्थांनी, कोणत्याही स्थितीत बंधारा नकोच, 144 कलम त्वरित हटवा अशी मागणी करीत पंचायतीने पूर्ण सहकार्य करावे, असा धोषा लावला.

यासंबंधी मुख्यमंत्र्यांच्या बंधारा भेटीनंतरही तोडगा न निघाल्यास तज्ज्ञांचा सल्ला घेऊन हे प्रकरण न्यायालयात नेले जाईल, असे आश्‍वासन सरपंच संजना नाईक यांनी दिले.

Murdi Khandepar News
President Droupadi Murmu In Goa: अन्‌ अचानक थांबला राष्‍ट्रपतींचा ताफा! विद्यार्थीही भारावले, त्याचं झालं असं की...

पंचायतीतर्फे विद्यमान पंचायत मंडळाने कोणताही दाखला दिलेला नाही, अशी ग्वाही सरपंच व इतरांनी दिली. आम्ही ग्रामस्थांच्या मागणीचा आदर करतो आणि त्यांच्यासोबत राहणार असल्याचे पंचायत मंडळाने स्पष्ट केले.

यावेळी ग्रामस्थांनी, बंधारा बांधकामासाठी रस्ता काम सुरू असल्याने ते आधी बंद करा, अशी मागणी केली. शेवटी बंधारा बांधकामाची प्रत्यक्ष पाहणी करण्याचे ठरले. परंतु 144 कलम लागू असल्याने गर्दी करणे गैर असल्याने सरपंच संजना नाईक, पंचसदस्य अभिजीत गावडे, मनीष नाईक यांनी बंधारा बांधकामाला भेट देऊन पाहणी केली.

राष्ट्रपतींच्‍या दौऱ्यामुळे तेथे पुरेशा प्रमाणात पोलिस तैनात नव्हते. शिवाय कामही बंद होते. त्यामुळे पाहणी केल्यानंतर योग्य कार्यवाही करू, असे आश्‍वासन सरपंच आणि पंचांनी ग्रामस्थांना दिले.

Murdi Khandepar News
Sambhaji Bhide In Goa: संभाजी भिडेंचे महात्‍मा गांधी, तिरंगा विषयावर प्रक्षोभक वक्तव्य, हिंदूंना चिथावणी

अन्यथा न्यायालयात जाणार

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी मुर्डी-खांडेपार येथील बंधाऱ्याची पाहणी करणार असल्याचे जाहीर केले आहे. शनिवारपर्यंत ही पाहणी होणार असल्याचे समजते.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीवेळी त्यांना आवश्‍यक माहिती देण्याबरोबरच बंधारा बांधकाम रोखण्याची विनंती ग्रामस्थ व पंचायत मंडळ करणार आहे. त्यानंतरही सरकारने योग्य कार्यवाही न केल्यास न्यायालयात जाण्याचा निर्णय ग्रामस्थ व पंचायत मंडळाने घेतला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com