Plastic Use: कुठे आहे बंदी? पणजीत सर्रासपणे प्लास्टिकचा वापर सुरुच!

Goa: महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवली असली तरी या मोहिमेला जी धार हवी होती, ती नसल्याचे दिसून येते.
Plastic Use
Plastic UseDainik Gomantak
Published on
Updated on

Panjim: 50 मायक्रॉनहून कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा अजूनही शहरात सर्रासपणे व्यावसायिक करीत आहेत. महापालिकेने प्लास्टिकविरोधी मोहीम राबवली असली तरी या मोहिमेला जी धार हवी होती, ती नसल्याचे दिसून येते.

एकवेळ वापराच्या प्लास्टिकला बंदी असली तरी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्यांचा मासळी, कपडे, भाजी विक्रेत्यांकडे चोरून वापर सुरू आहे. ग्राहकांना पिशव्या देणे हे कर्तव्यच आहे, अशी त्यांची धारणा आहे.

महापालिका मार्केट, कदंब बस स्थानक परिसरातील फुलविक्रेते, फळविक्रेते कमी जाडीच्याच प्लास्टिक पिशव्या वापरतात. काही आठवड्यांपूर्वी नगरसेवक उदय मडकईकर यांनी कमी जाडीच्या प्लास्टिक पिशवीतून मासे दिले जात असल्याचे छायाचित्र समाज माध्यमांवर सामायिक केले होते.

Plastic Use
Goa Petrol-Diesel Price: एक वर्षानंतर कच्च्या तेलाच्या किंमतीत घट, जाणून घ्या गोव्यासह देशभरातील पेट्रोल-डिझेलचे दर

त्यानंतर महापालिका बाजार समितीला जाग आली, पण कारवाई शून्यच राहिली. दरम्यान, प्लास्टिक विरोधी कारवाईविषयी महापालिका बाजार समितीचे चेअरमन बेन्टो लॉरेन यांना संपर्क साधला असता, ते परदेशवारीवर असल्याची माहिती मिळाली. गोव्यात येताच कारवाईविषयी सर्व माहिती देतो, असेही त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com