Goa:एमपीटीच्या कंटेनर सेवेची आज शेवटची फेरी

२९ वर्षांपासून सुरू होती सेवा ः सेवा अखंडित ठेवण्यासाठीचे प्रयत्न निष्फळ
Goa Mpt Container
Goa Mpt Container Dainik Gomantak

पणजी : एमपीटीमधून (Mpt) कंटेनर (Murmgoa Port) फिडर सेवा कायमची बंद होण्याची धोक्याची घंटा गेल्या काही वर्षांपासून वाजवली जात होती. (Goa) अखेर तो दिवस आला आणि २९ वर्षांपासून सुरू असलेली कंटेनर फीडर सेवेचे जहाज (Ship) मंगळवारी बंदरात दाखल झाले. आता ते बुधवारी सकाळी परत न येण्याच्या जलप्रवासाला निघेल. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, दोन कंटेनर जहाजे (एसएम माही आणि एसएम कावेरी) गोवा बंदरात सात दिवसांतून एकदा चालत असत. ते मुंद्रा-गोवा-मंगलोर-कोचीन-कोलंबो-मुंद्रा मार्गावर जलप्रवास करीत. अनेक कंपन्या प्रचंड गियरलेस कंटेनर व्हेसल्स ठेवण्याचा पर्याय निवडत होत्या. परंतु एमपीटीकडे अशा जहाजांना हाताळण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा उपलब्ध नव्हत्या. ही जहाजे मोठी आहेत आणि सुमारे २६० मीटर आहेत. जहाजांना क्रेन नाही. शिपिंग उद्योग विकसित झाला असे मानले तरी एमपीटीकडे अशा गियरलेस जहाजांना पद्धतशीर हाताळण्यासाठी सुविधा नाही. कोणतीही कंपन्या कमी व्हॉल्युम, उच्च दर आणि कमी पायाभूत सुविधांसह टिकू शकत नाहीत आणि म्हणूनच गोव्यात सेवा बंद करण्यात आली. कंटेनर जहाजाने पुरवलेल्या इतर बंदरांमध्ये ही सेवा सुरू राहील. मध्यंतरी मुरगाव पोर्ट ट्रस्ट (एमपीटी) आणि गोवा औद्योगिक संघटना (Gsi), गोवा चेंबर्स ऑफ कॉमर्स अँड इंडस्ट्रीज (Gcci) सारख्या इतर संबंधित घटकांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, खासदार, केंद्रीय जाहोजोद्योग आणि वाणिज्य मंत्रालयाकडे अर्ज, विनंतीद्वारे केलेले प्रयत्न निष्फळ ठरले.

Goa Mpt Container
Goa: आम्हाला बेकायदा ठेवू नका, घरपट्टी लागू करा

एकूणच परिस्थिती पाहता, एमपीटीमध्ये कंटेनर हब (Mpt) बनण्याची क्षमता आहे. (Container Hub) परंतु यामध्ये रस्ता वाहतूकदारांचा गट प्रबळ ठरल्याची शक्यता वर्तवली जात आहे. हा गट बंदराच्या विरोधात असूनसुद्धा बहुतांश कंटेनर या प्रबळ गटाद्वारे हाताळले जातात. त्यांना अनेक प्रभावशाली लोकांचे पाठबळ आहे. फार्मास्युटिकल कंपन्यांचे सर्व कंटेनर रस्त्याद्वारे मुंबईतील जेएनपीटी (mumbai) बंदरात (Jnpt) पोहोच करतात. या सर्व कंपन्यांनी ठरवले तर एमपीटीचा पश्चिम किनारपट्टीवर कंटेनर हब होण्याचा मार्ग कोणीही रोखू शकत नाही. उच्चस्तरीय सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक फार्मा कंपन्या कंटेनर (Farma) सेवेला (Company) अनुकूल आहेत. परंतु इतकी वर्षे फार्मा कंपन्या बंदरातून कधीच आल्या नाहीत आणि त्यांची स्वतःची कारणे असू शकतात. राज्य सरकारच्या समन्वयातून एमपीटी आणि फार्मा कंपन्यांशी करार झाला तर एमपीटीद्वारे वाहतूक करण्याचा कंटेनरचा मार्ग प्रशस्थ होऊ शकतो.

Goa Mpt Container
Goa: असुरक्षित इमारतींना नोटीसा दिल्या पण दखल कितींची घेतली

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com