Goa News: मुरगाव हिंदू समाज, श्री महालक्ष्मी पूजनोत्सव समिती 2022 मुरगाव तालुका मर्यादित नरकासुर वध स्पर्धेत प्रथम बक्षीस श्री राम स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लबला प्राप्त झाले. त्यांना रोख 40 हजार रुपयांचे बक्षीस देऊन गौरविण्यात आले. तर आकाशकंदील स्पर्धेचे प्रथम बक्षीस रक्षंदा च्यारीला प्राप्त झाले.
बक्षीस वितरण समारंभाला वास्कोचे आमदार कृष्णा साळकर प्रमुख पाहुणे तर मुरगावचे आमदार संकल्प आमोणकर विशेष अतिथी म्हणून उपस्थित होते. मुरगाव हिंदू समाज, श्री महालक्ष्मी पूजनोत्सव समितीतर्फे घेतलेल्या नरकासुर वध स्पर्धेत एकूण 23 पथकांनी भाग घेतला होता. तर आकाशकंदील स्पर्धेत एकूण 13 स्पर्धकांनी भाग घेतला होता.
स्पर्धांचा सविस्तर निकाल पुढीलप्रमाणे: नरकासुर वध स्पर्धेसाठी प्रथम बक्षीस रुपये 40 हजार (श्री राम स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लब, मेस्तवाडा), दुसरे बक्षीस रुपये 30 हजार (ब्रह्मस्थळ संस्थान, पांडुरंगवाडी), तिसरे बक्षीस 25 हजार रुपये (श्री गजानन युवा मंडळ) यांना प्राप्त झाले.
स्पर्धेतील उत्तेजनार्थ बक्षिसे रायझिंग युथ ऑफ वास्को, सुदर्शन स्पोर्ट्स क्लब-बायणा, मुंडवेल युवक संघ, शिवप्रासादिक स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल वल्ब व पॅरामाऊंट बॉयज भुटेभाट यांना अनुक्रमे प्राप्त झाली. तर उत्कृष्ट श्रीकृष्णसाठी श्रीराम स्पोर्ट्स ॲण्ड कल्चरल क्लब यांना प्राप्त झाले.
आकाशकंदील स्पर्धेत प्रथम बक्षीस - रक्षंदा च्यारी, दुसरे - गुंजिता च्यारी, तिसरे - सरिता कट्टीमणी. उत्तेजनार्थ बक्षिसे अनुक्रमे भगवान धावडे, ईशा गोसावी, पवन शिवसागर यांना प्राप्त झाली.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.