मासे विक्रेत्यांना मुरगाव नगरपालिकेचे अखेर लेखी आश्वासन

मुरगाव नगरपालिकेने अखेर लेखी आश्वासन देण्यास सहमती दर्शविल्याने वादविवाद तात्पुरता मिटला.
मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर
मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa: वास्कोच्या पारंपारिक मासे विक्रेत्यांनी केलेल्या मागण्या (Fish Seller Demands) मुरगाव नगरपालिकेने (Mormugao) अखेर लेखी आश्वासन (Written assurance) देण्यास सहमती दर्शविल्याने वादविवाद तात्पुरता मिटला.

वास्को शहरात नवीन मासळी मार्केट उभारण्याचा विषय मागची पाच वर्षे रखडत राहिलेला आहे.सध्या अस्तित्वात असलेल्या मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांनी प्रारंभी अनेक मुद्दे मांडून या मार्केटला विरोध केला होता. मात्र, आमदार कार्लुस आल्मेदा तसेच मुरगाव पालिकेला त्यांच्या शंका कुशंका तसेच समस्या दूर करण्यास मध्यंतरी यश आले होते.

मात्र, आता पुन्हा मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी शहरात होणारी घाऊक मासेविक्री व इतर विविध ठिकाणी होणारी मासे विक्री बंद केली तरच मार्केटमधील स्थलांतर करणार असल्याचे स्पष्ट केले.

मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर
कॉंग्रेसच्या माजी मंत्र्यांच्या मुलाचा तृणमुलमध्ये प्रवेश

वास्कोतील मासे विक्रेत्यांसाठी तात्पुरत्या मासळी मार्केटची व्यवस्था करण्यात आलेली असून पुढील दोन दिवसांत जुन्या मार्केटमधील मासळी विक्रेत्यांचे त्या मार्केटमध्ये स्थलांतर करण्यात येणार असल्याचे व त्यानंतर जुन्या मार्केटच्या जागी नवीन मार्केट उभारणीच्या कामाला सुरुवात होणार असल्याचे स्थानिक आमदार कार्लुस आल्मेदा यांनी म्हटले होते. त्यानुसार काल गुरुवारी सकाळी पहिला प्रयत्न फळविक्रेत्यांपासून झाला. मात्र, अधिकारी व पोलिसांना मासे विक्रेत्या व फळविक्रेत्यांकडून स्पष्ट नकार मिळाला.

मासळी मार्केटमधील मासे विक्रेत्यांनी शहर व परिसरात होणारी घाऊक मासे विक्री तसेच इतरत्र ठिकाणी होणारी मासे विक्री बंद करण्याची मागणी केल्याने ही मागणी पूर्ण करण्यासाठी पालिका प्रशासनाने पावले उचलली आहेत. या मागणीमुळेच मासे विक्रेत्यांचे स्थलांतर काही दिवस लांबणीवर पडले होते. परंतु पालिकेला आता मासळी मार्केटबाहेरील मासे विक्री बंद करण्यासाठी पावले उचलल्याने मासे विक्रेत्यांची ही मागणीही पूर्ण होणार आहे. परंतु जोपर्यंत एकही मासे विक्रेता मार्केट बाहेर मासे विकताना दिसणार नाही तोपर्यंत मार्केटमधील मासे विक्रेत्या महिला मार्केट सोडण्याच्या तयारीत नाहीत.

मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर
पाणी समस्या सोडवा अन्यथा 'घागर मोर्चा'

दरम्यान बुधवारी पार पडलेल्या बैठकीनंतर काल गुरुवारी पालिका अधिकाऱ्यांनी वास्कोतील मार्केट बाहेरील फळविक्रेत्यांना प्रथम गाठले. यावेळी त्यांच्यासोबत पोलीस फौजफाटाही होता. आज शुक्रवारपर्यंत तात्पुरत्या काळासाठी बांधण्यात आलेल्या नवीन मार्केटमध्ये स्थलांतर करण्याची सूचना अधिकाऱ्यांनी फळविक्रेत्यांना केली होती. मात्र, फळविक्रेत्यांनी आपण मासे विक्रेत्यांसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट करून त्यांनी स्थलांतर करण्यास नकार दिला.

फळविक्रेत्यांना हटवण्याचा प्रयत्न होत असल्याचे दिसून येताच मार्केटमधील मासे विक्रेत्या महिलांनी बाहेर येऊ हस्तक्षेप केला. फळविक्रेत्या व मासे विक्रेत्यांपैकी कोणीच स्थलांतर करणार नसल्याचे स्पष्ट करून त्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. शहरात अनेक ठिकाणी होणाऱ्या मासे विक्रीचाही त्यांनी उल्लेख केला व त्यांच्यावर कारवाईची मागणी केली. मासे विक्रेत्या महिलांनी व फळ विक्रेत्यांनी ठाम नकार देऊन अधिकाऱ्यांना व पोलिसांनी तेथून जाण्यास भाग पाडले. त्यामुळे काही वेळ वातावरण तापले.

फळ विक्रेत्यांना आणि मासे विक्रेत्यांना जुन्या मार्केटमधून हटवण्याचा प्रयत्न पालिका व पोलिसांकडून आज शुक्रवारी पुन्हा होणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले होते. त्यामुळे वास्कोतील वातावरण तापणार असेच वातावरण होते.

मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर
काँग्रेसला चर्चिलचे युतीबाबत 'फायनल अल्टीमेटम'

दरम्यान आज सकाळी नव्याचे काँग्रेसचे उमेदवार जोश राजू काब्राल वास्कोत मासळी व त्यांच्या मदतीला धावून आले जोपर्यंत मुरगाव पालिका लेखी आश्वासन देत नाही तसेच तात्पुरते शेड मध्ये व्यवस्थित व्यवस्था व्यवस्था करत देत नाही तोपर्यंत मासळी मार्केटमधील महिलांनी व फळ विक्रेत्यांनी जागा सोडण्याचा सल्ला दिला गेल्या चाळीस वर्षापासून सदर व्यवसायिक आपला व्यवसाय करत असून ज्या स्वाभाविक रित्या यामुळे येथील असून त्यांची पाठराखण करणे माझे कर्तव्य असल्याचे ते म्हणाले.

आज सकाळी वास्को पोलिसांकडून परेड करण्यात आला. वास्को शहरात खारीवाडा तसेच मासळी मार्केटकडे ३० पोलीस कर्मचार्‍यांच्या चमूने फेरफटका मारला व ते निघून गेले. यात महिला पोलिस कॉन्स्टेबलचाही समावेश होता. यावेळी मासळी मार्केटमधील मासेविक्रेत्यांमध्ये चलबिचल वातावरण निर्माण झाले होते.

मुरगाव नगरपालिकेत घेण्यात आलेल्या बैठकीत उपस्थित मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर व इतर
मुख्यमंत्र्यांच्या आश्वासनावर ACGL कामगारांचा संप तात्पुरता स्थगित

दरम्यान आज दुपारी मुरगाव पालिकेत नगराध्यक्षच्या केबिन मध्ये घेण्यात आलेल्या संयुक्त बैठकीत रापोणकारांचो एकवोटचे वोलेंसियो सिमाॅईश,किस्तोद डिसोझा तसेच गोंयचो आवाजाचे नेते कॅ.विरीयाटो त्यांच्या मदतीला धावून आले. यावेळी मासळी विक्रेत्यांनी पुन्हा आपल्या एकदा आपल्या समस्या मुख्याधिकारी जयंत तारी, नगराध्यक्ष दामोदर कासकर यांच्यासमोर मांडल्या तसेच जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत मार्केट न सोडण्याचा पवित्रा घेतला. इतक्यावरच न थांबता त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांकडे लेखी स्वरुपात आश्वासन मागितले. त्यानुसार त्यांच्या मागण्या मान्य करण्यात आलेल्या लेखी स्वरूपात मुख्याधिकाऱ्यांनी तीन दिवसात देण्याचे मान्य केले. त्यानुसार मार्केट मधील मासे विक्रेत्यांना आणखी तीन दिवसांची मुदत मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com