Mopa Airport: मोपा विमानतळाला 777 कोटींचा तोटा, प्रवासी संख्येत वाढ न झाल्याने ताण

mopa airport 777 crore loss: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरुवातीपासूनच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे.
mopa airport 777 crore loss
mopa airport 777 crore lossDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मोपा येथील मनोहर आंतरराष्ट्रीय विमानतळाला सुरुवातीपासूनच मोठ्या आर्थिक तोट्याचा सामना करावा लागत असल्याची माहिती समोर आली आहे. विमानतळाचे संचालन करणाऱ्या जीएमआर गोवा इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेड यांच्या आर्थिक आकडेवारीनुसार, विमानतळाला आतापर्यंत सुमारे ७७७ कोटी रुपयांचा एकत्रित तोटा झाला आहे.

असे असले तरी राज्य सरकारच्या महसुलावर या तोट्याचा काहीही परिणाम होत नाही. करारानुसार विमानतळाच्या एकूण महसुलाच्या ३६.९९ टक्के वाटा राज्य सरकारला मिळत आहे. उपलब्ध माहितीनुसार, २०२२-२३ या आर्थिक वर्षात विमानतळाला १४८.३ कोटी रुपयांचा तोटा झाला होता.

mopa airport 777 crore loss
Goa Education: शाळेची घंटा वाजणार 6 जूनपासून, महाविद्यालयीन शैक्षणिक वर्ष 19 पासून होणार प्रारंभ, शालेय साहित्य दरात 15 टक्क्यांनी वाढ

त्यानंतर २०२३-२४ मध्ये हा तोटा वाढून ३६३.३ कोटी रुपयांवर पोहोचला. तर २०२४-२५ मध्येही २६६ कोटी रुपयांचा तोटा नोंदविला आहे. शिवाय २०२५-२६ आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीतच ६३.३ कोटी रुपयांचे नुकसान झाले असून, संपूर्ण वर्षातील तोटा ३३१.२ कोटी रुपयांवर गेल्याचे समोर आले आहे.

दरम्यान, मोपा आणि दाबोळी या दोन्ही विमानतळांतील प्रवासी विभागणी, पर्यटन हंगामावर असलेले अवलंबित्व तसेच विमान कंपन्यांच्या मर्यादित सेवांमुळे विमानतळाच्या उत्पन्नावर परिणाम होत असल्याची चर्चा सुरू आहे. विमानतळ व्यवस्थापनाकडून भविष्यात मालवाहतूक, आंतरराष्ट्रीय उड्डाणे आणि पूरक व्यावसायिक प्रकल्पांवर अधिक भर देण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

mopa airport 777 crore loss
PM Narendra Modi Goa Visit: पंतप्रधान नरेंद्र मोदी सप्‍टेंबरमध्‍ये गोव्‍यात; विकास प्रकल्पांची होणार पायाभरणी, CM प्रमोद सावंतांची माहिती

प्रवासी संख्येत वाढ न झाल्याने ताण

राज्य आणि केंद्र सरकारने मोठ्या अपेक्षांनी उभारलेल्या या विमानतळाकडून पर्यटन, रोजगार आणि आंतरराष्ट्रीय वाहतूक वाढीस चालना मिळेल, अशी अपेक्षा होती. मात्र, अपेक्षित प्रमाणात प्रवासी संख्या आणि विमानसेवा वाढ न झाल्याने आर्थिक ताण वाढल्याचे मानले जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com