Mopa Airport News: ‘न्यू गोवा विमानतळ’ फलक हटवा; अन्यथा तीव्र आंदोलन' - सुभाष केरकर

Mopa Airport: भाऊसाहेब बांदोडकर नामकरण समितीचा गंभीर इशारा
Mopa International Airport | Goa News
Mopa International Airport | Goa News Dainik Gomantak

Mopa Airport News: गोव्याचे भाग्यविधाते तथा पहिले मुख्‍यमंत्री भाऊसाहेब बांदोडकर यांचेच नाव मोपा विमानतळाला देण्‍यात यावे. या प्रकल्‍पाचे कंत्राट घेतलेल्या ‘जीएमआर’ कंपनीला र्नामांतर करण्याचा कुठलाही अधिकार नाही.

या कंपनीने राष्ट्रीय महामार्ग 66 वर लावलेले ‘न्यू गोवा आंतरराष्ट्रीय विमानतळ’ अशा प्रकारचे फलक त्वरित हटवावेत. अन्यथा कंपनीविरोधात तीव्र आंदोलन छेडू, असा इशारा भाऊसाहेब बांदोडकर मोपा आंतरराष्ट्रीय विमानतळ नामकरण समितीचे निमंत्रक सुभाष केरकर यांनी येथे पत्रकार परिषदेत दिला.

गेल्या तीन वर्षांपासून मोपा विमानतळाला भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी आम्‍ही करीत आहोत. त्‍यासाठी विविध माध्यमांद्वारे सरकार, चाळीसही आमदार, खासदार, आणि पंतप्रधान कार्यालयाला निवेदने देण्‍यात आलेली आहेत.

या विमानतळ प्रकल्पाला नाव कोणाचे द्यावे, याचा अधिकार कंपनीला कोणी दिला? सरकारने याची गंभीर दखल घ्यावी, अन्यथा होणाऱ्या परिणामांना सामोरे जावे लागेल, असा गंभीर इशाराही केरकर यांनी दिला.

Mopa International Airport | Goa News
Rohan Khaunte Statement on IIT: नवे आयटी उद्योग राज्यासाठी वरदान ; राज्याच्या आयटी क्षेत्राला एक नवी गती मिळेल

या पत्रकार परिषदेला दीपेश नाईक, प्रा. गजानन मांद्रेकर, रुपेश नाईक, विनायक च्यारी, रामदास मोरजे, समीर परवार, नारायण गडेकर यांची उपस्‍थिती होती.

‘आरपीआय’ही मैदानात

मोपा विमानतळाला भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर किंवा भाऊसाहेब बांदोडकर यांचे नाव द्यावे, अशी मागणी भारतीय रिपब्लिकन पक्षाच्या (कांबळे गट) गोवा समितीने केली. यावेळी गोवा अध्यक्ष अमित कोरगावकर, सचिव तुळशीदास परवार, प्रीती नाईक उपस्थित होत्‍या.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com