Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak

Goa Monsoon 2023: वाळवंटीच्या पातळीत वाढ; पुराची भीती, पण स्थिती नियंत्रणात

साखळीत पूरप्रतिबंधक यंत्रणेचे काम सुरू
Published on

साखळीतील वळवंटी नदीच्या पातळीत वाढ झाल्याने बाजारात वाळवंटीच्या किनारी असलेल्या पूरप्रतिबंधक यंत्रणेचे काम सुरू झाले आहे. मंगळवारी मध्यरात्रीनंतर पंपिंग सुरू करून बाजारातील बाजारातील नाल्यात साचणारे पाणी नदीत सोडण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली आहे.

मंगळवारी दिवसभर तसेच रात्रभर जोरदार पडलेल्या पावसामुळे वाळवंटीची पातळी रात्री वाढली होती. बाजारातील नाल्याची पातळी ३.४० मीटर, तर नदीची पातळी ३.५० मीटर झाल्यानंतर नाल्याचे गेटस् बंद करण्यात आले. व नाल्यातील पाण्याचे पंपिंग करून ते पुन्हा नदीत फेकण्याची प्रक्रिया हाती घेण्यात आली.

Goa Monsoon
Salaulim Dam OverFlow: साळावली धरण 'ओव्हरफ्लो'; पर्यटकांना धरणावर जायचे असल्यास लागणार 'ही' गोष्ट

हरवळेतील धबधब्याला रौद्ररूप

हरवळे साखळी येथील श्री रुद्रेश्वर देवाच्या समोर उंचावरून कोसळणाऱ्या भीमतीर्थ धबधब्याने रौद्ररूप धारण केले आहे. या धबधब्यात विसर्जित होणाऱ्या नदीला सततच्या पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे उधाणच आले होते.

त्यामुळे या धबधब्याचे स्वरूप अत्यंत भयानक बनले आहे. या धबधब्याला मोठ्या प्रमाणात पाणी आल्याने पैलतीरी असलेल्या जैन मंदिराकडे जाण्यासाठी असलेला लोखंडी पूल पाण्याखाली गेला होता.

Goa Monsoon
Govind Gaude यांचा राज्य सरकारला घरचा अहेर; अटल सेतूच्‍या कामातही अनेक गोष्‍टी, पण...

15 तासात 7 इंच पावसाची नोंद

साखळी परिसरात दिवसभर बराच पाऊस झाला. संध्याकाळी ५.३० वा. पर्यंत २.११ इंच पाऊस नोंद झाला होता. साखळी परिसरात मंगळवारी संध्याकाळी ५.३० ते बुधवारी सकाळी ८ या पंधरा तासात ७ इंच पावसाची नोंद झाली आहे. त्यानंतर दिवसभर पाऊस चालूच होता. संध्याकाळपर्यंत नदीची पातळी एकसमान होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com