Goa Monsoon Update
Goa Monsoon UpdateDainik Gomantak

Goa Monsoon Updates: राज्यात पुन्हा अतिवृष्टीचा इशारा

खराब वातावरणामुळे गोव्यातील मासेमारीला मोठी ब्रेक लागला आहे.
Published on

पणजी: पावसाने (Monsoon) सोमवारी पुन्हा जोर धरला. राज्याच्या (Goa) विविध भागांना पावसाने झोडपले. पुढील दोन दिवस अतिवृष्टीचा इशारा हवामान वेधशाळेने (IMD Goa) दिला आहे. खराब वातावरणामुळे राज्यातील मासेमारीला (Fishing) मात्र ब्रेक लागला आहे.

Goa Monsoon Update
महाराष्ट्रात मुसळधार पाऊसाची शक्यता: हवामान विभाग

काल सोमवारी पहाटेपासून पावसाने राज्यातील अनेक भागांना झोडपून काढले. पणजी शहरात तीन तासांत 13 मि.मी.पावसाची नोंद झाली. सकाळीच पावसाचा जोर वाढल्याने कामासाठी घराबाहेर पडणाऱ्यांची तारांबळ उडाली. मंगळवार आणि बुधवारी राज्यात ‘यलो अलर्ट’ जारी करण्यात आला असून बहुतेक ठिकाणी अतिवृष्टी होईल, असे वेधशाळेने म्हटले आहे. मच्छीमारांनी दक्षता घ्यावी, असे आवाहनही वेधशाळेकडून करण्यात आले आहे.

आधीच खवळलेला दर्या आणि बेभरवशाचे हवामान यामुळे गोव्यातील ट्रॉलर्स अजून किनाऱ्यावरच नांगरलेल्या अवस्थेत आहेत. त्यामुळे गोवेकरांची आस केरळ कर्नाटक आणि महाराष्ट्रातून आलेल्या मासळीवरच भागविली जात आहे.

बंगालच्या उपसागरामध्ये कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होत असल्याने येत्या दोन ते तीन दिवसांमध्ये महाराष्ट्रात देखील मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. महाराष्ट्रातील कोकण, मध्य महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवड्यामध्ये 19 ऑगस्टपर्यंत मुसळधार पाऊस पडण्याचा अंदाजही हवामान विभागाने वर्तविला आहे. त्याचबरोबर कोकण आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी अतिवृष्टीचा इशारा मुंबईच्या प्रादेशिक हवामान केंद्राकडून देण्यात आलाय.

Goa Monsoon Update
Goa Floods Impact: सरकारची पुराबाबत उपाययोजनांकडे पाठ

कोकणातही पाऊसाचा अंदाज

कोकणातील अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस पडणार असा अंदाज मुंबईच्या प्रादेशिक हवामान विभागाद्वारे देण्यात आलाय. कोकणातील रायगड, ठाणे, पालघर, रत्नागिरी या जिल्ह्यांमध्ये यलो अलर्टही जारी करण्यात आलाय. तर दुसरीकडे सिंदुदुर्गात काही तुरळक ठिकाणी पाऊस पडायला सुरवातही झाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com