Goa Monsoon Updates: ऑगस्टमध्ये पावसाच्‍या सरासरीत तीन टक्क्यांची तूट

गोव्‍यातील स्‍थिती : मान्‍सूनसाठी अत्‍यंत अनुकूल वातावरण असूनही प्रमाणात झाली घट
Goa Monsoon Updates
Goa Monsoon UpdatesDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: यंदा मान्‍सूनसाठी (Goa Monsoon) अरबी समुद्र आणि पश्‍चिम बंगालच्या उपसागरात अनुकूल वातावरण असतानाही ऑगस्टमध्ये देशात समाधानकारक पाऊस झालेला नाही. ही स्थिती गोव्यासह संपूर्ण दक्षिण द्वीपकल्पात आहे. गोव्यात ऑगस्ट महिन्यात सरासरीत 3 टक्क्यांची तूट झाली आहे.

यंदा देशभरात सर्वाधिक पावसाची शक्यता हवामान वेधशाळेने वर्तविली होती. जून आणि जुलैमध्ये पावसाचा जोर होता. त्यामुळे काही राज्यांना महापुराचा फटकाही बसला. गोव्यालादेखील गेल्‍या महिन्यात त्याचा अनुभव आला. मात्र, ऑगस्टमध्ये पावसाच्या प्रमाणात लक्षणीय घट झाली आहे. संपूर्ण देशात आतापर्यंत 9 टक्के इतक्या पावसाची घट झाली आहे. सुदैवाने दक्षिण द्वीपकल्प विभागात 4 टक्क्यांची वाढ आहे. गोव्यात मात्र पावसाची टक्केवारी घटत चालल्याने दोन महिन्यांत मुसळधार पाऊस होऊनही अद्याप पावसाने शंभरी गाठलेली नाही.

Goa Monsoon Updates
Goa Assembly Elections: चिदंबरम यांनी कॉंग्रेस पदाधिकाऱ्यांची घेतली बैठक

मान्सून सुरू झाल्यानंतर आतापर्यंत तीनवेळा ब्रेकस्‍पेल झाला आहे. पहिल्यांदा 8 ते 19 जून, जुलै महिन्यात तीन दिवस, तर ऑगस्ट महिन्यात पाच दिवसांचा ब्रेकस्पेल राहिला आहे. त्यामुळे एकूण सरासरीच्या तुलनेत पावसाचे प्रमाण घटले आहे.

घट चिंताजनक

राज्यात या हंगामाच्या पहिल्या दोन महिन्यांत मान्सून सामान्य होता. ऑगस्टमध्ये मान्सूनची स्थिती अगदीच कमकुवत आहे. ही ब्रेक प्रकारची स्थिती आहे. मान्सूनमध्ये आतापर्यंत तीन टक्क्याची तूट झाली असून, ती चिंताजनक आहे. याचा परिणाम शेतीवर हाेण्‍याची शक्‍यता आहे.

Goa Monsoon Updates
Goa Theatres to Open: ‘एसओपी’ पाळा अन् चित्रपट पाहा

राज्‍यात उघडीप

राज्यात पावसाने पूर्णतः उघडीप दिली आहे. बुधवारी सकाळी पणजी, दाबोळी, मुरगाव आणि सांगे येथे पावसाच्या तुरळक सरी कोसळल्या. आतापर्यंत राज्यात सरासरी 98.6 इंच पाऊस झाला आहे. 25 ऑगस्टपर्यंत 101 इंच पाऊस व्हायला हवा होता, परंतु त्‍यात घट दिसून येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com