Shapora River : ‘शापोरा’ची पातळी नियंत्रणात

‘तिळारी’तून विसर्ग : ‘साळ’ तूर्त सुरक्षित; प्रशासकीय यंत्रणा सज्ज
 Shapora River
Shapora River Dainik Gomantak
Published on
Updated on

Shapora River : एका बाजूने कोसळधार, तर दुसऱ्या बाजूने ‘तिळारी’ धरण प्रकल्पातून पाणी बाहेर सोडण्यात येत असले, तरी शापोरा नदी पूर्ण नियंत्रणात आहे. त्यामुळे या नदीकाठी वसलेल्या साळसह जवळपासच्या गावांवर पुरासारखी आपत्ती ओढवण्याची शक्यता कमीच आहे.

‘तिळारी’तून झालेल्या जलविसर्गामुळे यापूर्वी साळ गावावर सलग तीन वर्षे पुराची आपत्ती कोसळली होती. जवळपासच्या गावांनाही पुराचा तडाखा बसला होता. त्यामुळे यावेळी तिळारीतून पाणी सोडण्यात येत असल्याने नदीकाठी वसलेल्या गावांतील जनतेला सावधगिरीचा इशारा देण्यात आला होता.

दरम्यान, प्रशासकीय यंत्रणा सजग असून तिळारीतील परिस्थितीवर जातीने लक्ष देत आहे. त्यामुळे जनतेने भयमुक्त राहावे, असे आवाहन आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी केले आहे.

गेल्यावर्षीचा अपवाद सोडल्यास त्यापूर्वी तिळारीतून जलविसर्ग होऊन सलग तीन वर्षे साळ गावाला पुराचा तडाखा बसला होता. मात्र, गेल्यावर्षी साळ गावाला पुराचा अजिबात तडाखा बसला नाही.

 Shapora River
Goa monsoon 2023: शिकवणीसाठी विद्यार्थी आले अन् घरावर झाड पडले; शिवोलीतील घटना

आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी जातीने लक्ष घालून वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना मार्गी लावल्याने गेल्यावर्षी पुरासारखी आपत्ती ओढवली नव्हती.

संभाव्य धोका टळला

‘तिळारी’ धरणातील पाणी वाढल्याने जलविसर्गाचा धोका निर्माण झाला होता. हा धोका ओळखून दोन दिवसांपूर्वी धरणाचे दरवाजे उघडण्यात आले होते.

तिळारीचे पाणी सोडूनसुद्धा शापोरा नदीचा प्रवाह पूर्ण नियंत्रणाखाली आहे. सध्या शापोरा नदीवरील साळ येथील पदपुलाच्या साधारण मीटरभर खालून पाणी वाहत आहे. त्यामुळे साळ गावावर पुराचे संकट ओढवण्याचा सध्यातरी धोका नाही.

 Shapora River
Goa Assembly Monsoon Session 2023 : बोगस कॉल सेंटर्समुळे राज्याच्या प्रतिमेला धक्का; कायदा, सुव्यवस्था ढासळली

साळ गावावरील पुराचा धोका टाळण्यासाठी सर्वदृष्टीने प्रयत्न सुरू आहेत. पूरप्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून साळ येथे शापोरा नदीवर ‘बॅरेज’ प्रकल्प उभारण्यात येणार आहे. त्यादृष्टीने हालचाली सुरू आहेत. पावसाळ्यानंतर प्रकल्पाच्या कामाला प्रत्यक्ष सुरवात होणार आहे. प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर साळ गावावरील पुराचे संकट कायमचे दूर होणार असून, जनताही भयमुक्त होणार आहे.

डॉ. चंद्रकांत शेट्ये, आमदार

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com