Goa Monsoon Update: विमानसेवेला फटका, नदीनाले तुडुंब, नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण

Goa Monsoon Update
Goa Monsoon Update
Published on: 
Updated on: 

पणजी: गोवा (Goa)राज्यात रेड अलर्ट(Red alert) जारी आहे. पावसाने सलग दुसऱ्या दिवशी झोडपून काढले. पेडण्यात मंगळवारी सर्वाधिक पावसाची नोंद झाली. सलगपणे पाऊस सुरू राहिल्याने नदीनाले तुडुंब भरले असून नदीकाठच्या लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. पावसाच्या प्रभावामुळे अनेक घरांच्या भिंती कोसळल्या व लाखो रुपयांचे नुकसानही झाले. झाडे कोसळली. विजेचे खांब कलंडले आणि वीजप्रवाह खंडित होण्याचे प्रकार घडत आहेत. (Goa Monsoon Update Pernem in Goa received the heaviest rainfall on Tuesday)

महाराष्ट्र, गोवा आणि कर्नाटकातील काही भागात, विशेषत: या पश्चिम राज्यातील किनारपट्टीच्या प्रदेशात येत्या 24 तासात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. हवामान खात्याच्या अंदाजानुसार, पुढील तीन दिवसांत कोकण, गोवा, कर्नाटक आणि केरळ या भागात  मुसळधार, गडगडाटी वादळासह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे.

सलग दुसऱ्या दिवशी विमानसेवेवर परिणाम
खराब हवामानाचा फटका विमानसेवेला बसला. मुसळधार पाऊस आणि हवामानातील बदलामुळे सकाळचे एअर इंडियाचे म्हैसूर-गोवा-म्हैसूर विमान रद्द करण्यात आले. संध्याकाळचे दिल्ली-गोवा-दिल्ली हे विमान रद्द करण्यात आले. एकूण विमानांच्या दहा फेऱ्यांपैकी आज आठ फेऱ्या झाल्याची माहिती सूत्रांनी दिली.

मंगळवारचा पाऊस (मि.मी.मध्ये) 

  • पेडणे.................30.5
  • वाळपई................25
  • म्हापसा...............25.5
  • जुने गोवे...............21
  • पणजी................12.5
  • मुरगाव.................10
  • काणकोण..............7.5

बोरी परिसरातमुसळधार पाऊस

गेल्या दोन दिवसापासून पावसाने जोर धरल्याने बोरी गावात सर्वत्र पाणीच पाणी झाले आहे. बोरी गावातील सिध्दनाथ पर्वतावरून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणावर येथील कुडयाळ नाल्यातून वाहून येते. मंगळवार 15 रोजी पडलेल्या जोरदार पावसामुळे  देऊळवाडा कोपले पेडाकडील शेतीत मोठ्या प्रमाणावर पाणी वाहून जात असल्याने शेतीला नदीचे स्वरूप प्राप्त झाले होते. जोरदार पावसाचे पाणी खाजोर्डा देवदांडा गटारात तुंबून राहिले होते. तसेच आजोर्डा, तिशे बोरीच्या रस्त्याशेजारील गटारे पावसाच्या पाण्याने दुधडी भरून वाहत होती. 

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

BJP plans to increase women representation in Goa Assembly
Bank fraud of 75 lakh rupees in Goa
Goa Bicholim marigold flower cultivation
Farmers demand rejection of mining NOC in Goa
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com