Goa Yellow Alert: यावर्षी पावसाने जरा उशिराच हजेरी लावली मात्र नंतर त्याचे रौद्र रूप पाहायला मिळाले. गोव्यात मागील काही दिवसांपासून पावसाने थोडी विश्रांती घेतली आहे. परंतु आता पाऊस पुन्हा सक्रिय होणार आहे. याबाबत राज्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
भारतीय हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, या मोठ्या ब्रेकनंतर राज्यात पुन्हा पावसाच्या जोरदार सरी कोसळणार आहेत. या पार्श्वभूमीवर IMD तर्फे येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.
माहितीनुसार, सासष्टी, केपे, सांगे, तिसवाडी तसेच मुरगाव तालुक्यात जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
प्रशांत महासागरात निर्माण झालेल्या अल निनो स्थितीमुळे गेल्या काही दिवसांपासून पावसाने राज्यात दडी मारली आहे. मात्र, मॉन्सूनची ही स्थिती भारतीय उपखंडाला त्रासदायक ठरली आहे.
यामुळे शेजारील महाराष्ट्र आणि कर्नाटकसह अनेक राज्यांमध्ये केवळ ३० टक्के पावसाची नोंद झाली आहे. यामुळे कृषी क्षेत्राला मोठा फटका बसेल, असा अंदाज कृषी तज्ज्ञ व्यक्त करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.