Goa Monsoon: 'मान्सून'चं कमबॅक; मुसळधार सरींमुळे 20 जूनला 71 टक्के असलेली तूट 52.9 टक्क्यांवर, शेतकरी आणि नागरिकांना दिलासा

Goa Weather Update: राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे.
Goa Monsoon
Goa MonsoonDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्यात मागील दोन-तीन दिवसांपासून जोरदार पाऊस सुरू आहे. परिणामी २० जून रोजी सुमारे ७१ टक्के असलेली पावसाची तूट आता १८.८ टक्क्यांपेक्षा जास्‍त भरून निघाली असून ती ५२.९ टक्क्यांवर आली आहे.

मागील २४ तासांत राज्यात सरासरी २.१२ इंच पावसाची नोंद झाली. अात्तापर्यंत राज्‍यात २७ इंच पाऊस अपेक्षित असताना प्रत्यक्षात १२.९९ इंच पाऊस पडला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत २४.६० इंच पाऊस झाला होता.

Goa Monsoon
Goa Electricity: वीज ग्राहकांना मिळणार दंडाचे 43 कोटी परत, पुढील बिलांतून वळते; वीज विभागाचा मोठा निर्णय

वाळपईत अखेर पावसाची नोंद सुरू

मान्सून सुरू झाल्यानंतर वाळपईतील पावसाची अधिकृत नोंद होत नव्‍हती. मात्र माध्यमांतील पाठपुराव्यानंतर आता तेथे नोंदणी सुरू करण्यात आली आहे. मागील २४ तासांत वाळपईत ३.६२ इंच इतका पाऊस नोंदवण्यात आला असून तो राज्यात दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक पाऊस ठरला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com