Valpoi mansoon Update : पावसामुळे सत्तरीत नुकसान सुरूच; ‘कोसळ’धार कायम !

पडझडही सुरूच ः साटी, गटारो ओढ्यांना पूर; केळावडे, रावण गावांचा तुटला संपर्क
Valpoi
ValpoiDainik Gomantak

वाळपई : सत्तरी तालुक्याला सलग दुसऱ्या दिवशी आजही संततधार व मुसळधार पावसाने झोडपले. त्यामुळे काही ठिकाणी रस्त्यांवर मोठ्या प्रमाणांवर पाणी येऊन वाहतूक ठप्प झाली होती. सत्तरी तालुक्यात केरीहुन केळावडे-रावणला जाणाऱ्या मार्गावरील साटी आणि गटारो या ओढ्यांना पूर आल्यामुळे त्यावरचे छोटे पूल पाण्याखाली गेले. . त्यामुळे या गावांचा संपर्क तुटला आहे.

दरम्यान, तिसऱ्या दिवशीही पडझड सुरूच असून लाखोंची हानी झाली आहे. दिवसभर संततधार कोसळणाऱ्या पावसामुळे काही ठिकाणी पूरसदृष्य स्थिती काही प्रमाणात दिसून आली. तसेच गुळेली पंचायत क्षेत्रातील पैकुळ गावातील पुंडलिक नाईक यांचे घर कोसळून हानी झाली.

Valpoi
Valpoi News - वाळपई मामलेदार इमारतीची संरक्षण भिंत कोसळली | Gomantak TV

ठिकठिकाणी पडझडीच्या घटनांची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे अधिकारी संतोष गावस यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीकांत गावकर, अशोक नाईक, अविनाश गावकर, रुपेश सालेलकर, सुधाकर गावकर, साईनाथ सावंत, रुपेश सालेलकर, अरविंद देसाई, प्रदीप गावकर, प्रितेश गावकर, ज्ञानेश्वर गावस, अदम खान, चारुदत्त पळ, गोकुळदास डेगवेकर आदींनी मदत कार्य केले.

पडझडीत घरांची मोठी हानी

पैकुळ येथे पुंडलिक नाईक यांचे घर जमीनदोस्त झाले. वाळपई प्रभाग १० मध्ये नायदा खान यांच्या घरावर झाड पडून हानी, पर्येत कृष्णा बाबी राणे यांच्या घरावर रानटी झाड पडून १५ हजारांचे नुकसान, कोपार्डेत हरीजनवाडा येथे नीलेश परवार यांच्या कुंपणावर आब्यांचे झाड पडले. नागवेत कृष्णा केरकर यांच्या घरावर झाड पडून १० हजारांची हानी झाली. पडझडीत दोन लाखांची हानी झाली. २ लाखांची मालमत्ता वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले.

Valpoi
Valpoi News : 46 वर्षांची अविरत संगीत सेवा; आता ध्यास तबलापटू घडवण्याचा, वाचा सत्तरीतील कलावंताची अनोखी कहाणी

सोनाळ, कडतरीत रस्ते पाण्याखाली

असाच पाऊस झाल्यास वाळवंटी नदीला पूर येण्याची शक्यता असून घोटेली गावाला पुराचा धोका निर्माण झाला आहे. दरम्यान, सावर्डे पंचायत क्षेत्रातील सोनाळ, तार, कडतरी या गावांच्या मार्गावर आज सायंकाळी म्हादईचे पाणी आल्याने रस्ता वाहतुकीस बंद झाला होता. दरवर्षी हा रस्ता पाण्याखाली जातो.

शाळांना सुट्टी द्या !

संततधार सुरु असल्याने नद्यांच्या पातळीत वाढ झाली आहे. सरकारचा आपत्कालीन विभाग सक्रिय होण्याची गरज आहे. एका बाजूला पाऊस तर दुसऱ्या बाजूने सोसाट्याचा वारा सुटला असल्याने पडझडीचे सत्र सुरूच आहे. सरकारने सत्तरीत शाळांना उद्या सुट्टी घोषित करावी,अशा पालकांची मागणी आहे.

Valpoi
Valpoi Crime News : वाळपईत एकावर बाचाबाचीतून हल्ला; पोलिसांचा तपास सुरू

काही गावे काळोखातच..

मुसळधार पावसात गेल्या काही दिवसांपासून विजेचा लपंडावही सुरू आहे. मध्यरात्री हदोडे सत्तरी येथे आंब्याचे झाड वीज तारांवर पडून वीज पुरवठा खंडित झाला.नगरगाव पंचायत भागातील बरीचशी दुर्गम गावे काळोखात आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com