Goa Monsoon 2023 : पेडणे तालुक्यात पडझड सुरूच; लाखोंचे नुकसान

केरी येथे रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर चिंचेचे मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली.
Rain update
Rain updateDainik Gomantak

पेडणे : जोरदार पाऊस व सतत पडणाऱ्या मोठ्या पावसामुळे पेडणे तालुक्यात काल व आज सर्वत्र मोठ्या प्रमाणात झाडांची पडझड झाली. यामुळे पेडणे तालुक्यात सुमारे लाखोची हानी झाली असून पेडणे अग्निशमन दलाच्या जवानांची अहोरात्र धावपळ सुरू आहे. काल संध्याकाळी पवनवाडा - केरी येथे रस्त्यावर व वीज वाहिन्यांवर चिंचेचे मोठे झाड पडल्याने वाहतूक कोंडी झाली.

सोणये तुये येथे क्रॉस वर माड पडल्याने सुमारे दहा हजारांची हानी झाली. दाडाचीवाडी येथे धारेश्वर मंदिराजवळ प्रवासी शेडवर झाड पडून दहा हजारांची हानी झाली. आश्वे मांद्रे येथे रस्त्यावर अकेशियाचे झाड कोसळून रस्ता वाहतुकीस बंद झाला. आज हरमल येथे कलावती मंदिराजवळ घरावर झाड पडून हानी झाली. देवसु येथे वडाचे झाड पडून वीजखांब मोडला. वस्तवाडो - केरी येथे अमित वस्त यांच्या घरावर झाड पडून पन्नास हजारांची हानी झाली.

Rain update
Pernem News : कुठल्याही क्षेत्रात सहकार्य ठरते महत्त्वपूर्ण : प्रसाद लोलयेकर

मांद्रेत खलप हायस्कूलजवळ झाड पडून काही तास वाहतूक बंद पडली.नामदेव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुनील देसाई, जयराम शेटगावकर, प्रदीप आसोलकर,अल्वारीस मास्कारेन्हास, मॅथ्यू मेंडोसा, विठ्ठल परब, शैलेश हळदणकर, राजेश परब, आशीर्वाद गाड, केतन कामुलकर, धनंजय वस्त, संदेश पेडणेकर ,श्रीनेत कोरखणकर, रजत नाईक यांनी मदतकार्य केले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com