Goa Assembly: चोडण येथे फेरी बोट बुडण्याचे मुख्य कारण 'अयोग्य देखभालच', आलेमाव यांचा आरोप; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Assembly Session Updates: गोवा पावसाळी अधिवेशनाच्या चौथ्या दिवसाच्या घडामोडी आणि इतर महत्वाची माहिती.
Goa Assembly Session 2025
Goa Assembly Session 2025Dainik Gomantak
Published on
Updated on

चोडण येथे बुडालेल्या फेरी बोटीमागे 'अयोग्य देखभाल'! युरी आलेमाव यांचा गंभीर आरोप.

गेल्या महिन्यात चोडण येथे एक फेरी बोट पाण्याने भरल्याने बुडाल्याची घटना घडली होती. या घटनेमागे बोटीच्या टाकीत पाणी शिरणे हे कारण सांगितले जात असले तरी, ही स्पष्टपणे देखभालीची (Maintenance) समस्या होती, असा दावा विरोधी पक्षनेते (Leader of Opposition) युरी आलेमाव यांनी केला आहे.

आजारपणामुळे दिल्लीत उपचार घेत असलेले पर्यावरण मंत्री आलेक्स सिक्वेरा विधानसभा सभागृहात उपस्थित

अटल आसरा योजनेअंतर्गत गेल्या २-३ वर्षांपासून अनेक अर्ज प्रलंबित

अटल आसरा योजनेअंतर्गत गेल्या २-३ वर्षांपासून अनेक अर्ज प्रलंबित आहेत. गेल्या दोन वर्षांपासून ऑनलाइन पोर्टल बंद आहे: आमदार गोविंद गावडे

आमदार कार्लोस यांचा अभिलेखागार विभागात फसवणुकीचा आरोप

असे काही लोक आहेत ज्यांनी अभिलेखागार विभागाचे बनावट शिक्के मिळवले आहेत. मला संशय आहे की विभागातील काही माजी कर्मचारी कागदपत्रे बनवून रेकॉर्ड तयार करण्यात मदत करत आहेत. सरकारने यावर कठोर कारवाई करावी. मी माझ्या माहितीत आलेल्या मंत्र्यांना नावे देखील देईन, ज्यांना आम्ही या फसवणुकीचे सूत्रधार मानतो: आमदार कार्लोस फेरेरा

आमदार वीरेश यांनी नावे बदलण्याबाबत चिंता व्यक्त केली

आरजीपीचे आमदार वीरेश बोरकर यांनी विचारले की, लाभ मिळविण्यासाठी व्यक्तींनी त्यांची नावे पारंपारिक गोव्यातील आडनावांमध्ये बदलली आहेत अशा प्रकरणांवर सरकारने काय पावले उचलली आहेत. उत्तरात, मुख्यमंत्र्यांनी सांगितले की, पुढील आठवड्यात या विषयावर चर्चा केली जाईल.

पर्यटकांचा माग काढणे आव्हानात्मक आहे

रस्ते आणि रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांचा गोवा कसा माग काढतो असा प्रश्न आमदार जित आरोलकर यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, पर्यटक खरे पर्यटक आहेत की इतर कारणांसाठी, ज्यामध्ये गुन्हेगारी हेतूचा समावेश आहे, ते पडताळण्यासाठी सीमेवर काही यंत्रणा आहेत का?

पर्यटकांचा माग काढणे आव्हानात्मक

रस्ते आणि रेल्वेने येणाऱ्या पर्यटकांचा गोवा कसा माग काढतो असा प्रश्न आमदार जित आरोलकर यांनी उपस्थित केला. त्यांनी विचारले की, पर्यटक खरे पर्यटक आहेत की इतर कारणांसाठी, ज्यामध्ये गुन्हेगारी हेतूचा समावेश आहे, ते पडताळण्यासाठी सीमेवर काही यंत्रणा आहेत का?

पार्किंग उल्लंघनाबद्दल रेंट-ए-कॅब चालकांना वाहतूक मंत्र्यांचा इशारा

रेंट-ए-कॅब सेवांसाठी परवाने असलेल्यांनी त्यांची वाहने त्यांच्या स्वतःच्या आवारात पार्क करावीत. जर त्यांची वाहने निवासी इमारतींबाहेर पार्क केलेली आढळली तर कठोर कारवाई केली जाईल: वाहतूक मंत्री

'मराठी'वरून सभागृहात पुन्हा शाब्दिक द्वंद्व!

सरकारी राजपत्र मराठीतही प्रसिद्ध करण्याच्या आमदार जीत आरोलकरांच्या 'शून्य प्रहरा'तील मागणीला विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, विजय सरदेसाईंचा विरोध. हा विषय 'शून्य प्रहरा'ला उपस्थित करता येत नसल्याचे म्हणत राजभाषा कायद्यात दुरुस्ती करण्याचे सरकारला दिले आव्हान.

युरोपियन पर्यटकांना 'Visa On Arrival' द्या!

  • युरोपियन देशांतील पर्यटकांना 'व्हिसा अॉन अराईव्हल' सुविधा दिल्यास गोव्याच्या पर्यटनासाठी ते 'गेम चेंजर' ठरण्याचा आमदार मायकल लोबोंचा दावा.

  • विदेशी पर्यटकांना 'व्हिसा अॉन अराईव्हल' सुविधा देण्याचे फायदे आणि तोटेही आहेत. या विषयावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा करण्याची पर्यटनमंत्री रोहन खंवटेंची हमी.

पर्यटकांवरून खंवटे-मायकलमध्ये जुंपली!

  • परराज्यांतील अनेकांचे गोवा हे 'सेकंड होम'. आल्यानंतर ते आपल्या घरांत राहतात. त्यामुळे त्यांचा डेटा मिळत नाही. पण, गेल्या सहा महिन्यांत पर्यटकांच्या संख्येत वाढ : रोहन खंवटे, मंत्री, पर्यटन

  • बाहेर असलेले गोमंतकीय पर्यटन काळात गोव्यात आल्यानंतरही त्यांनाही पर्यटक मानले जात असल्याने आकडे फुगले. राज्यात येणारे पर्यटक घटले हे निश्चित : मायकल लोबो, आमदा

लोबोंचा सरकारला 'घरचा आहेर'!

गोव्यात येणार्‍या देशी-विदेशी पर्यटकांची संख्या घटली. पर्यटन व्यवसायातील प्रश्नांवर कुणीच तोडगा काढत नाही. आम्ही इथे फक्त भाषणांसाठी येतोय : आमदार मायकल लोबोंचा 'घरचा आहेर

सभापतींच्या हमीनंतर विरोधक माघारी; कामकाज सुरू

सभागृहाचे कामकाज सुरू. प्रश्नोत्तराचा तास संपल्यानंतर चर्चा करण्याची हमी सभापती रमेश तवडकर यांनी दिल्यानंतर विरोधक माघारी. सभागृहाचे कामकाज पूर्वपदावर

'टीसीपी'वरून ६ विरोधकांनी विश्वजीतना घेरले!

  • नगरनियोजन खात्याबाबत विचारलेले प्रश्न जाणीवपूर्वक पुढे ढकलल्याचा दावा करीत ६ विरोधी आमदार सभागृहात आक्रमक. सभापतींसमोरील हौदात घेतली धाव. आमदार विजय सरदेसाई जाग्यावर बसून.

  • काही विषय न्यायप्रविष्ट असल्याने उत्तरे न दिल्याचे मंत्री विश्वजीत राणेंचे उत्तर

"लोकसभेत काँग्रेसने एसटी आरक्षण विधेयकाला विरोध केला नाही" युरी आलेमाओ

लोकसभेत काँग्रेसने एसटी आरक्षण विधेयकाला विरोध केला नाही. त्यावेळी बिहारशी संबंधित आणखी एक मुद्दा चर्चेत होता आणि तो विधेयक मांडण्यात आला नाही. त्यांना ते पुन्हा मांडू द्या. आम्ही एसटी समुदायासोबत आहोत.: युरी आलेमाओ

अरुंद रस्त्यांमुळे आम्ही सर्व मार्गांवर ईव्ही बसेस तैनात करू शकत नाही

अरुंद रस्त्यांमुळे आम्ही सर्व मार्गांवर, विशेषतः ग्रामीण भागात ईव्ही बसेस तैनात करू शकत नाही: उल्हास तुएनकर, केटीसी अध्यक्ष

आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही तर त्यासा

जर २०२७ पर्यंत एसटी आरक्षण विधेयक मंजूर झाले नाही तर त्यासाठी काँग्रेस जबाबदार असेल: डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री

डिचोलीच्या नवीन चौपदरी बगलमार्गावर पुन्हा दरड कोसळली

दरड कोसळली. पावसाच्या तडाख्यात डिचोलीच्या नवीन चौपदरी बगलमार्गावर पुन्हा दरड कोसळली. दरड रेलिंगला अडकल्याने अनर्थ टळला. वर्षांपूर्वी याच बगलमार्गावर अन्यत्र कोसळली होती दरड.

यात्रेकरूंच्या गटाने श्री अमरनाथ गुहेला दिली भेट

ज्ञानदीप प्रस्थान, म्हापसा येथील विश्वस्त डॉ. सुशांत तांडेल यांच्या नेतृत्वाखाली २४ गोव्यातील यात्रेकरूंच्या गटाने काल संध्याकाळी श्री अमरनाथ गुहेला भेट दिली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com