Goa Monsoon Assembly: आजपासून पावसाळी अधिवेशन! कला अकादमीच्या विषयावरून गदारोळाची शक्यता; सरकारला विरोधक घेरणार

३१२९ प्रश्नांचा होणार भडिमार
Goa Monsoon Assembly Session 2023
Goa Monsoon Assembly Session 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Assembly Session 2023: गोवा विधानसभेच्या उद्या मंगळवारपासून सुरू होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज कला अकादमीच्या खुल्या रंगमंचाचे छत कोसळल्याची आयती संधी विरोधकांच्या हाती आल्याने विधानसभेचे कामकाज पहिल्या दिवसापासूनच गदारोळात सुरू होणार अशी चिन्हे आहेत. यासाठी विरोधकांनी कडवी रणनीती आखली असून सरकारला घेरण्याची पुरेपूर तयारी केली आहे. यावेळी तब्बल ३ हजार १२९ प्रश्नांचा भडिमार सरकारवर होणार आहे.

Goa Monsoon Assembly Session 2023
Sanjivani Sugar Factory: 121 ऊस उत्पादकांना पोलिसांनी घेतले ताब्यात; धोरण स्पष्ट करण्याची मागणी

आठव्या विधानसभेचे पाचवे अधिवेशन उद्या मंगळवार १८ जुलैपासून सुरू होत असून ते १० ऑगस्टपर्यंत १८ दिवस चालेल. या अधिवेशनासाठी आजपर्यंत ७७९ तारांकित, तर २३५० अतारांकित असे एकूण तब्बल ३ हजार १२९ प्रश्न आले आहेत.

यावरून हे अधिवेशन अधिक आक्रमक होणार हे निश्चित आहे. यासाठी विरोधकांनी सरकारला घेरण्याची कडवी रणनीती तयार केली असून काही प्रश्न एकत्र (क्लब) केले आहेत. ज्यामुळे सरकारला त्या प्रश्नांची उत्तरे देणे भाग पडणार आहे.

अधिवेशनाचा काळ अधिक असावा यासाठी विरोधकांनी यापूर्वीच सरकारवर टीका केली होती. मात्र, सभापती रमेश तवडकर यांनी यापुढील अधिवेशन वीस दिवसांचे असेल असे जाहीर केले होते. मात्र, यावेळी सरकारने १८ दिवसांचे अधिवेशन असावे असा प्रस्ताव विधानसभा प्रशासनाला दिला आणि तो मंजूर झाला.

विधानसभेच्या पटलावर विविध प्रश्न

अधिवेशनात राज्यात वाढणारी गुन्हेगारी, जंगलांमध्ये लागलेल्या आगी, पर्यटन विभागातील काही कथित अधिकाऱ्यांकडून घेतले जाणारे हप्ते, एसटी आरक्षण, वाढती महागाई, स्मार्ट सिटी, वीज बिल दरवाढ, जमीन हडप प्रकरणे, म्हादई, सरकारकडून केले जाणारे इव्हेंट यासारखे अनेक प्रश्न आले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com