Goa Monsoon 2023: सावधान! राज्यात पावसाचा पॅटर्न बदलतोय; जुलैमध्ये 76 वर्षांतील सर्वाधिक पाऊस

Goa Monsoon 2023: तर ऑगस्ट महिना ठरला 100 वर्षांतील सर्वाधिक कोरडा
Goa Monsoon
Goa MonsoonSandip Desai
Published on
Updated on

गंगाराम आवणे

Goa Monsoon 2023: राज्यातील मॉन्सून कालावधी संपुष्टात आला असून आता मॉन्सूनोत्तर पावसाला सुरवात झाली आहे. यंदा राज्यात मॉन्सूनचे पंधरा दिवस उशिरा आगमन झाले, अल निनोचे संकटही घोंगावत होते असे असून देखील यंदा राज्यात समाधानकारक पाऊस पडला.

यंदा सरासरीपेक्षाही ११.५ टक्के अधिक पाऊस झाला आहे. गेल्यावर्षी सरासरीच्या तुलनेत पावसात १० टक्क्यांनी घट झाली होती. त्यामुळे यंदा राज्यात चांगला पाऊस पडला असे म्हणावे लागेल.

राज्यातील पावसाचा पॅटर्न बदलत असल्याचे चित्र असून हे एक प्रकारे हवामान बदलाचे सूचक आहेच, शिवाय धोक्याचीही घंटा आहे.

एका वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडणे, एका वर्षी कमी, एखाद्या वर्षी सरासरी पाऊस पडणे असा पावसाचा पॅटर्न मागील पाच वर्षांच्या आलेखावरून दिसून येत आहे.

गुजरात किनारपट्टी ओलांडलेल्या बिपरजॉय चक्रीवादळामुळे आणि गोव्यासह संपूर्ण भारतीय उपखंडात कमकुवत मॉन्सूनची स्थिती असल्यामुळे जून महिन्यात राज्यात कमी प्रमाणात पाऊस झाला. सप्टेंबर शेवटच्या पंधरवड्यातील पावसाने राज्यातील पावसाची तूट भरून काढली.

Goa Monsoon
Mukhyamantri Annapurna Yojana: ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा’ योजना जाहीर; सरकारची घोषणा

अनियमित पाऊस ठरतोय घातक

मागील काही वर्षांत एकाच दिवशी मोठ्या प्रमाणात पाऊस पडण्याच्या घटना वाढत आहेत. एकाच दिवशी कमाल ४ ते ६ इंच पाऊस पडण्याच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने मोठ्या प्रमाणात त्याचा फटका शहरी तसेच ग्रामीण भागातील नागरिकांना बसत आहे.

अचानक नद्यांच्या पात्रांत वाढ होणे, दरड कोसळणे, रस्ता खचणे, झाडे पडणे अशा घटना यामुळे घडत असल्याने यावर शासनाने विचारमंथन करून योग्य पाऊल उचलणे गरजेचे आहे.

जून ते सप्टेंबरमधील पाऊस (इंचात)

केपे - १४६, सांगे - १४०, फोंडा - १३८ पेडणे - १३५, म्हापसा-१३३, वाळपई - १३२, मडगाव - १३०, जुने गोवे १२९, साखळी १२७, काणकोण - १२४, मुरगाव - ११६, दाबोळी १११.४८ मि.मी.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com