रस्त्यावर खड्डे, खड्यात ‘नरकासुर’; गांजे -उसगाव येथे आयडियाची कल्पना

गांजे -उसगाव येथे देखील रस्ता खड्डे पडल्याने खराब झाला आहे.
Usgao-Ganjem Road
Usgao-Ganjem RoadDainik Gomantak

Usgao-Ganjem Road: राज्यात मागील दोन आठवड्यांपासून मुसळधार पावसाने थैमान घातले आहे. सततच्या पावसामुळे अनेक ठिकाणी पडझड, पाणी साचणे, भूस्खलन रस्ता खचणे यासह रस्त्यावर खड्डे देखील निर्माण होत आहेत. स्मार्ट सिटी पणजीतील रस्त्यांची अवस्था अतिशय दयनीय झाली आहे.

अशाच प्रकारे गांजे -उसगाव येथे देखील रस्ता खड्डे पडल्याने खराब झाला आहे. या खड्यांपासून लोकांना सावध करण्यासाठी एका व्यक्तीने येथे अनोखी शक्कल लढवली आहे.

रस्त्यावर खड्डे अधिक दिसू लागले की त्याठिकाणी वाहन चालकांना माहिती मिळावी म्हणून झाडाची फांदी, दगड अथवा दिशादर्शक चिन्ह ठेवले जाते. दरम्यान, गांजे-उसगाव येथील खड्डेमय रस्त्याची सूचना मिळावी यासाठी अज्ञात व्यक्तीने चक्क नरकासुर प्रतिमेचे शिर खड्यात ठेवले आहे.

याचा एक फोटो समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे. लोक यावर प्रतिक्रिया व्यक्त करत असून, एखादी दुर्घटना घडण्यापूर्वी खड्डेमय रस्ते तात्काळ दुरूस्त केले जावेत अशी मागणी करत आहेत. मुसळधार पावसात अनेक ठिकाणी निर्माण झालेल्या खड्यांमध्ये पाणी साचते यामुळे खड्यांचा अंदाज येत नाही व छोटे मोठे अपघात होतात.

Usgao-Ganjem Road
म्हादईप्रश्‍नी महत्वाची बातमी! कर्नाटकची नवी चाल; ‘डीपीआर’मध्ये केला बदल, धरणाची जागाही...

उसगाव ते वाळपई मार्गावरील धोकादायक खड्डे अपघातांना आमंत्रण देऊ लागले आहेत. गांजे, नाणूस व अन्य ठिकाणी रस्त्यावरील खड्ड्यांमध्ये पाणी भरून राहत असल्याने चालकांचा अंदाज चुकत आहे. त्यामुळे शनिवारी रात्री अज्ञातांनी धोकादायक खड्ड्यात झाडे लावून त्यावर नरकासुर प्रतिमेचे शिर लावून निषेध केला आहे.

राज्यात पावसाचा जोर वाढल्याने अनेक ठिकाणी रस्ते खचण्यासह खड्डे निर्माण होणे यासारखे प्रकार वाढले आहेत. वाहन चालकांना सतर्क राहून ड्रायव्हिंग करावे लागत आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com