Goa Monsoon 2023 : अखेर गोव्यात पावसाची 'शंभरी’ पार!

'त्या' 27 दिवसांच्या कमाल, सरासरीपेक्षा 18टक्के जादा पाऊस
Goa Monsoon Update 2023
Goa Monsoon Update 2023Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Monsoon Update : राज्यात 22 जूनपर्यंत गायब झालेल्या पावसाने पुढील 34-35 दिवसांत धमाल उडविली. त्यापैकी 27 दिवसात पडलेल्या अतिरिक्त पावसाने यंदा इंचाची शंभरीही लवकरच गाठली. गेला आठवड्याभर पावसाने उसंत घेतली असली तरी हलक्या आणि मध्यम स्वरूपात पडणाऱ्या सरींनी आज अखेर 100.10 इंचाची नोंद केली.

प्रशांत महासागरात सक्रिय असलेल्या ‘अल निनो’ मुळे यंदा केरळात ८-९ दिवस उशिरा मान्सून दाखल झाला. मात्र देशभरात सक्रिय होण्यासाठी त्याला फारसा वेळ लागला नाही. राज्यात पावसाने ११ जूनला हजेरी लावली खरी मात्र त्यानंतर दडी मारली.

Goa Monsoon Update 2023
Amrit Bharat Station Scheme: गोव्‍यातील 3, देशातील 1309 रेल्वे स्थानकांना देणार नवा साज : पंतप्रधान मोदी

दरम्यान, याच नैऋत्य मान्सून मार्गावर आलेल्या चक्रीवादळामुळे मान्सून मार्गात अडथळे आले आणि पाऊस बंद झाला होता. हीच अवस्था २०-२२ जून पर्यंत राहिली. राज्यातील काही धरणासह विहिरी, नद्या, नाले, कोरडी पडली होती.

राज्यात अनेक ठिकाणी तीव्र पाणी टंचाईची स्थिती निर्माण झाली. पाण्यासाठी जलस्त्रोत खात्यासह सार्वजनिक बांधकाम खात्याची पळापळ सुरू झाली होती. या दरम्यान बंगालच्या उपसागरात निर्माण झालेले झालेला कमी दाबाचा पट्टा आणि मध्य भारतात तयार झालेला भूखंडीय ऑफशोर टर्फ यामुळे मान्सूनचा वेग पुन्हा वाढला आणि २३ जूनपासून राज्यात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.

पुढे २७ जुलै पर्यंत राज्यात मान्सूनची सक्रिय हजेरी राहिली. या ३४-३५ दिवसांमधील ७ दिवस वगळता २७ दिवस अतिरिक्त पाऊस पडला. या अतिरिक्त पावसामुळेच राज्यातील पावसाची तूट भरून निघाली. आज अखेर पाऊस १८ टक्के अतिरिक्त पाऊस झाला आणि पावसाने इंचाची १०० ही पार केली आहे.

Goa Monsoon Update 2023
Goa Crime News: नवे वाड्डे वास्को येथे युवकाचा खून; पूर्ववैमनस्यातून चाकू हल्ला

शंभरीसाठी आठवड्याची प्रतीक्षा

राज्यात २१५४.३ मिलीमीटर पाऊस अपेक्षित असताना २५४२.७ मिलिमीटर पावसाची नोंद झाली मात्र २८ जुलैपासून पावसाने उसंत घेतल्याने पावसाची शंभरी होण्यासाठी आठवड्याभराची प्रतीक्षा करावी लागली. अद्यापही पावसाचे ऑगस्ट आणि सप्टेंबर हे दोन महिने शिल्लक आहेत. तत्पूर्वीच, राज्यातील सर्व धरणे तुडुंब भरून वाहत आहेत

१३ पैकी ६ केंद्रावर अतिरिक्त बरसात

राज्याच्या १३ मान्सून नोंदणी केंद्रापैकी पेडणे, फोंडा, वाळपई ,मडगाव, केपे, सांगे या ६ केंद्रांवर पावसाने इंचाचे शतक अगोदर पूर्ण केले आहे. म्हापसा आणि साखळी या २ केंद्रांतील पाऊस शतकाच्या प्रतीक्षेत आहे. यंदाच्या मोसमातील सर्वाधिक पाऊस सांगे केंद्रावर नोंदला गेला असून तो २,९४२ मिलिमीटर आहे. सर्वात कमी पाऊस मुरगाव केंद्रावर म्हणजे २,१३६ मिलिमीटर नोंदला गेला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com