Goa: कामत, आलेमाव यांच्यावरील आरोप निश्‍चितीबाबत आज निर्णय

लुईस बर्जर मनी लाँडरिंग प्रकरण (luise burgur money Londring Case)
Goa Mla Churchil Alemao And Digambar Kamat
Goa Mla Churchil Alemao And Digambar KamatDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी : राज्याच्या अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) मनी लाँडरिंगप्रकरणी (money Londring Case) माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि चर्चिल (Churchil alemao) आलेमाव यांच्याविरुद्ध सादर केलेल्या आरोपपत्रावर गुरुवारी पणजी सत्र न्यायालय आरोप निश्‍चितीचा निर्णय देणार आहे. (Panajim Court) या आरोपपत्रावर आरोप निश्‍चितीप्रकरणी सुनावणी पूर्ण होऊन त्यावरील निर्णय न्यायालयाने राखून ठेवला होता. लुईस बर्जर कंपनीच्या (Luise Burgur Company Case) अधिकाऱ्यांनी अमेरिकेतील न्यायालयात (America) गोव्यातील जायका प्रकल्पासाठी (Jaika Progect) कोट्यवधींची देवाणघेवाण झाल्याचा पर्दाफाश केल्यानंतर येथील क्राईम ब्रँचने (Crime Branch Goa) त्याची दखल घेत चौकशी सुरू केली होती. ही चौकशी सुरू असताना ‘ईडी’ने या प्रकरणात नावे पुढे आलेल्या दिगंबर कामत आणि चर्चिल आलेमाव यांच्या निवासस्थानी तसेच कार्यालयांवर छापे (Raid) टाकून सुमारे १.९५ कोटींची मालमत्ता ताब्यात घेतली होती. प्राथमिक चौकशीअंती या दोघांविरुद्ध मनी लाँडरिंग कायद्याखाली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले होते. या प्रकरणाचा तपास सुरू असतानाच ईडीने क्राईम ब्रँचकडून लुईस बर्जरच्या जायका प्रकल्प प्रकरणातून झालेल्या व्यवहाराची माहिती घेतली होती.

Goa Mla Churchil Alemao And Digambar Kamat
Goa: कळंगुट बागा येथे जीवघेणे खड्डे

मनी लाँडरिंगप्रकरणी (money Londring Case) न्यायालयात (Court) उद्या निर्णय होणार असल्याने आगामी विधानसभा निवडणुकीच्या दृष्टीने आमदार दिगंबर कामत (Digambar Kamat) आणि चर्चिल आलेमाव (Churchil Alemao) यांच्यासाठी तो महत्त्वाचा ठरणार आहे. सहा वर्षांपूर्वी हे लुईस बर्जर प्रकरण (Luise Burgur Company Case) तसेच जायका प्रकल्पासाठी (Jaika Progect) घेतलेल्या कथित व्यवहारामुळे राज्यात खळबळ उडाली होती. क्राईम ब्रँचमार्फत भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्याखाली सुरू असलेल्या प्रकरणात चर्चिल आलेमाव यांना अटक झाली होती, तर माजी मुख्यमंत्री दिगंबर कामत यांना अनेकदा गोत्यात आणण्याचा प्रयत्न पोलिसांनी केला. मात्र, त्यात त्यांना यश आले नव्हते. न्यायालयाने त्यांना अटकपूर्व जामीन दिल्याने सरकारकडून त्यांच्यावर दबाव आणण्याचे प्रयत्न निष्फळ ठरले होते.

Goa Mla Churchil Alemao And Digambar Kamat
Goa Assembly Elections: भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा राज्यव्यापी दौऱ्यावर

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com