Drowning Death: मोबोरच्या रिसॉर्टमध्ये दुर्दैवी घटना! किड्स पूलमधून मोठ्या पूलमध्ये गेल्याने 4 वर्षांच्या चिमुकल्याचा बुडून मृत्यू

Mobor Resort Swimming Pool Accident: मोबोर येथे संध्याकाळी एका नामांकित रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला.
Mobor Resort Swimming Pool Accident
Drowning DeathDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

मडगाव: मोबोर येथे आज संध्याकाळी एका नामांकित रिसॉर्टच्या स्विमिंग पूलमध्ये बुडून चार वर्षांच्या निष्पाप मुलाचा मृत्यू झाला. कोलवा पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नौदल अधिकाऱ्याचे कुटुंबीय स्विमिंग पूलजवळ पार्टीचा आनंद घेत होते.

यावेळी त्यांचा चार वर्षांचा मुलगा ‘किड्स पूल’मध्ये खेळत होता. दरम्यान, मुलाचे आई-वडील रिसॉर्टमधील रेस्टॉरंटमधून काही वस्तू आणण्यासाठी गेले. पालक काही काळासाठी बाजूला गेल्यानंतर खेळत असलेला मुलगा अचानक मोठ्या स्विमिंग पूलमध्ये आला.

Mobor Resort Swimming Pool Accident
Goa Politics: 'पणजीतूनच निवडणूक लढवणार, भाजपमध्येच राहणार'; उत्पल पर्रीकरांच्या संभाव्य घरवापसीवर बाबूश यांची स्पष्ट भूमिका

पाण्याचा अंदाज न आल्याने तो खोल पाण्यात बुडू लागला. स्विमिंग पूलवरील अटेंडंटने मुलाला पाण्यात बुडताना पाहून तात्काळ बाहेर काढले. त्याला वाचविण्याचे शर्थीचे प्रयत्न केले. मात्र, दुर्दैवाने त्याचा जीव वाचू शकला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com