RSS : 'आरएसएस'च्या सभेत मंत्र्यांची संघाच्या गणवेशात उपस्थिती; चर्चेला उधाण

गणवेशात येण्याचा आदेश संघाकडून आला होता की काय याची चर्चा
RSS Goa Bjp MLA
RSS Goa Bjp MLADainik Gomantak

RSS : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अध्यक्ष मोहन भागवत यांच्या पणजीतील सभेला राज्य सरकारातील मंत्रिगण व आमदारांची उपस्थिती होती. ही उपस्थिती विशेष लक्ष वेधून घेत होती, ती त्यांच्या पेहरावामुळे. त्यामुळे या सभेला उपस्थित राहायचे झाल्यास गणवेशात यावे, असा आदेश संघाकडून आला होता की काय याची चर्चा समाज माध्यमांत सभेपूर्वीच सुरू झाली होती.

RSS Goa Bjp MLA
Goa: आनंदाची बातमी! सामान्य जनतेसाठी सरकारचा मोठा निर्णय

पणजीतील बांदोडकर मार्गावर सायंकाळी भागवत यांची सभा आयोजिली आहे. त्यासाठी भाजपचेही सर्व आमदारांसह मंत्र्यांनाही निमंत्रण असल्याने सर्वांची विशेष रांगेत बसण्याची सोय केली आहे. या बैठकीच्या ठिकाणी बसलेल्यांध्ये विशेष लक्ष वेधत होते ते राष्ट्रीय स्वंयसेवक संघाच्या गणवेशात आलेल्या मंत्री व आमदारांचे. त्यात प्रामुख्याने मुख्यमंत्री प्रमोद सावंत, खासदार श्रीपाद नाईक, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, सभापती रमेश तवडकर, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, माजी खासदार नरेंद्र सावईकर, खासदार विनय तेंडुलकर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक सघांचा गणवेश परिधान केला होता. खाकी गडद रंगाची पॅंट, पांढरा सदरा आणि काळी टोपी असा हा पेहराव असल्याने विशेष लक्ष वेधत होता.

RSS Goa Bjp MLA
Mohan Bhagwat : भाजप सत्तेसाठी भ्रष्ट नेत्यांना पावन करुन घेतो... सरसंघचालक कडाडले

इतर स्वयंसेवकांनीही असाच पेहराव केला होता, ते स्वयंसेवक विशेष अंतर ठेवून बसले होते, परंतु आमदार, राज्य मंत्रिमंडळ निमंत्रितांसाठी खास बैठक व्यवस्था असल्याने त्या ठिकाणी ही सर्व मंडळी बसलेली होती.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com