सिलेंडर स्‍फोटात गमावले आणि विश्‍वजितनी सावरले!

गोव्यातील गावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता
House of Gaonkar Family
House of Gaonkar Family Dainik Gomantak
Published on
Updated on

पिसुर्ले: पर्ये मतदार संघात येणाऱ्या भिरोंडा पंचायत क्षेत्रातील अडवई येथिल प्रदीप गावकर यांच्या घरात विज शॉर्ट सर्किट होऊन सिलिंडरचा स्फोट होऊन घरासकट घरातील सामान उध्वस्त झाले होते, त्यामुळे गावकर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला होता, यांची दखल घेत राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे (Minister Vishwajit Rane) यांनी त्यांना तात्काळ आर्थिक साहाय्य केले व इतर गावकर मंडळींनी त्यांना सहकार्य करून लगेच त्यांच्या घराला वासे वापरून लाकडी कमान व कौले घालून घराची शाकारणी करून दिली, अशी माहिती पंच उदयसिंह राणे यांनी दिली.

प्रदीप गावकर यांच्या घरात दोन तीन दिवसांपुर्वी सिलिंडरचा स्फोट झाला होता, त्यामुळे त्यांच्या घरांचे कौलारू छप्परासकट घरातील किंमती सामान जळून खाक झाले होते, यामुळे त्या कुटुंबाची लाखो रुपयांची नुकसान झाली, अचानक घडलेल्या या घटनेमुळे गावकर कुटुंब पुर्ण पणे हादरून गेले होते, घरची परिस्थिती बेताची असल्याने घर कसे उभे करता येईल, या विवंचनेत गावकर कुटुंब सापडले होते.

House of Gaonkar Family
AAP-Trinamool Congressकडून कॉंग्रेसच्या नेत्यांना करोडो रुपयांची आमिषे

सदर घटनेची बातमी वाळपई मतदार संघाचे आमदार तथा राज्याचे आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांना समजताच त्यानी गावकर कुटुंबाला आर्थिक मदतीचा हात पुढे करून, सदर घराची तात्काळ दुरूस्ती करण्यास सांगितले, यात इतर गावकर मंडळींनी त्यांना सहकार्य करून काल दि 2 ऑक्टोबर रोजी अवघ्या काही तासांतच त्यांच्या घराची दुरुस्ती पुर्ण केली, यामुळे संकटात सापडलेल्या गावकर कुटुंबाला फार मोठा दिलासा मिळाला असून आरोग्य मंत्री विश्वजीत राणे यांनी दिलेली मदत तसेच गावकर मंडळींनी दुरूस्ती करण्यासाठी केलेल्या सहकार्य बद्दल गावकर कुटुंबाने सर्वांचे आभार व्यक्त मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com