हडप केलेल्या जमिनी विकण्यात गोवा सरकारच्या मंत्र्याचा हात; आपच्या पालेकरांचा खळबळजनक आरोप

Goa AAP: आमच्याकडे तसे पुरावे आहेत. योग्य वेळ आल्यावर जाहीर करणार आहोत; आप
हडप केलेल्या जमिनी विकण्यात गोवा सरकारच्या मंत्र्याचा हात; आपच्या पालेकरांचा खळबळजनक आरोप
Goa AAP President Amit PalekarDainik Gomantak
Published on
Updated on

आम आदमी पक्षाचे नेते अमित पालेकर यांनी नामोल्लेख टाळून राज्य सरकारातील एका मंत्र्यावर जोरदार आरोप केला आहे. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते म्हणाले, हडप केलेल्या जमिनींची प्रकरणे शोधून काढण्यासाठी सरकारने 'एसआयटी' स्थापन केली; परंतु अशा बळकावलेल्या जमिनी विकण्याचे काम एक मंत्री करत आहे.

सत्तेतील काही आमदारांनी आसगावात मालमत्ता खरेदी केल्या आहेत, असा दावा त्यांनी केला. योग्य वेळ येताच नामोल्लेख करू, अशी पुस्ती जोडत पालेकर यांनी झाकली मूठ ठेवणे पसंत केले.

पालेकर म्हणाले, जमीन हडप प्रकरणी एक सदस्यीय समितीने सरकारला अहवाल सादर केला आहे; मात्र तो सामान्य जनतेसाठी खुला करण्यात आलेला नाही. आम्हाला मिळालेल्या माहितीनुसार, हडप केलेली जमीन विकण्याचे काम एक मंत्री करत आहे.

अन्य काही आमदारही त्यात गुंतले आहेत. आमच्याकडे तसे पुरावे आहेत. योग्य वेळ आल्यावर जाहीर करणार आहोत. 'एसआयटी'च्या नावाखाली काही जमीन मालकांकडून पैसे उकळले जात आहेत, असा आरोपही त्यांनी यावेळी केला. राज्य सरकारचे धोरण रियल इस्टेट लॉबीच्या बाजूने राहिले आहे, अशी टीकाही त्यांनी केली.

हडप केलेल्या जमिनी विकण्यात गोवा सरकारच्या मंत्र्याचा हात; आपच्या पालेकरांचा खळबळजनक आरोप
Fatorda Goa: कुत्रे भुंकले आणि मांस चोरीचा प्रयत्न फसला; दोघे ताब्यात, एक फरार

आम आदमी पक्षाच्या आमदारांनी नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात गोव्याच्या हिताचे मुद्दे मांडले. वेंझी व्हिएगस आणि क्रूझ सिल्वा या अधिवेशनाचे स्टार आमदार होते, असे आपचे अध्यक्ष अमित पालेकर म्हणाले.

आपच्या आमदारांनी अधिवेशनात दक्षिण गोव्यात कायदा आणि सुव्यवस्था, रुग्णालये, आरोग्य सुविधा, कचरा, मासेमारी, नद्यांचे राष्ट्रीयीकरण आणि नवीन शैक्षणिक धोरणाबाबत सरकारला धारेवर धरत जाब विचारला.

आपच्या पदाधिकाऱ्यांनी गोवा सरकारने १८ दिवस दिर्घ अधिवेशन घेतल्याबाबत आभार देखील मानले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com