Goa Mine Issues: खाणप्रश्नी सरकार संवेदनशील; मुख्यमंत्री सावंत

मुख्यमंत्र्यांनी जाणून घेतली सेझा कामगारांची कैफियत (Goa Mine Issues)
CM Sawant talking with Mine Workers at Bicholim (Goa Mine Issues)
CM Sawant talking with Mine Workers at Bicholim (Goa Mine Issues)Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Mine Issues: खाणप्रश्नी सरकार गंभीर असून, पुढील तीन महिन्यात खाणी सुरु होणार असल्याचा विश्वास मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत (CM Dr Pramod Sawant) यांनी व्यक्त केला आहे. खाण कामगारांना (Mine Workers) शक्य ते सर्व पाठबळ देण्यासाठी सरकार प्रयत्न करणार असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. वेतन प्रश्नी सेझा (वेदांता) कंपनी व्यवस्थापनाकडे (Seza management) लवकरच आपण बोलणी करून हा प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्न करणार. अशी ग्वाही मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी डिचोलीतील सेझा खाण कामगारांना (Bicholim Mine Workers) दिली आहे.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत हे गुरुवारी मये मतदारसंघाच्या दौऱ्यावर असताना डिचोलीतील सेझा खाण कामगारांनी मये येथे मुख्यमंत्र्यांना गाठले. यावेळी मुख्यमंत्र्यांसमवेत मयेचे आमदार प्रवीण झांट्ये (Mayem MLA Pravin Zatye) देखील होते. या कामगारांनी मुख्यमंत्र्यांकडे आपली कैफियत मांडली. आम्हाला अर्धे वेतन मिळत असल्याने आम्ही आर्थिक संकटात अडकलेलो आहोत. कुटुंबाचा चारितार्थ चालवणे अवघड जात आहे, आदी अनेक समस्या आमच्यासमोर निर्माण झाल्या आहेत. आता चतुर्थी साजरी कशी करावी. या विवंचनेत आम्ही आहोत. अशी व्यथा कामगारांनी मुख्यमंत्र्यांसमोर मांडली. सरकारने आमच्या भवितव्याचा विचार करावा. अशी मागणी सेझा कामगार संघटनेचे अध्यक्ष निलेश कारबोटकर यांनी मुख्यमंत्र्यांजवळ केली.

CM Sawant talking with Mine Workers at Bicholim (Goa Mine Issues)
Goa: कळंगुटात पुन्हा गोवा माईल्स आणि स्थानिक टॅक्सी चालकांमध्ये राडा

यावेळी कामगार संघटनेचे किशोर लोकरे, नारायण गावकर, इंद्रकांत फाळकर, राजेश गावकर, दीपक पोपकर, संजय मांद्रेकर, बाबुसो कारबोटकर, महेश होबळे, अनिल सालेलकर आदी मिळून जवळपास शंभर कामगार यावेळी उपस्थित होते.

कामगार संघटनेच्या शिष्टमंडळाने गेल्या 27 जुलै रोजी पर्वरी येथे विधानसभेच्या परिषद सभागृहात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेवून त्यांच्यासमोर आपली व्यथा मांडून मागण्यांचे निवेदन सादर केलेले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com