Mhaisal Dam Goa: जुवारीतील पाणी म्हैसाळ धरणात वळवण्याची योजना- शिरोडकर

सुभाष शिरोडकर : शिरोडा परिसरातील तळ्यांचा विकास करणार
Mhaisal Dam Goa
Mhaisal Dam GoaDainik Gomantak

Mhaisal Dam Goa पंचवाडी येथील म्हैसाळ धरणाची क्षमता वाढून पंचवाडी, शिरोडा, बोरी आणि जवळपासच्या भागांना मुबलक पाणी उपलब्ध करण्यात येईल, असे जलस्रोत मंत्री सुभाष शिरोडकर यांनी सांगितले.

साळावली धरणातून सोडले जाणारे बरेच पाणी जुवारी नदीच्या पात्रातून वाहून जाते. हे पाणी म्हैसाळ धरणात वळविण्याची योजना असल्याचे शिरोडकर यांनी स्पष्ट केले.

शिरोडा पंचायत क्षेत्रात सातोरे, माधवतळे, तारीवाडा तलाव, तरवळे येथील पकरतळे तसेच पाज भागातील तलावांतील पाण्याचा वापर करून पूर्वजांनी येथील शेती, बागायती फुलवल्या होत्या.

या तलावांचा विकास करून नदीतून वाहून जाणारे पाणी येथे वळविण्यात येईल. त्यामुळे या भागात नवी हरितक्रांती होईल, असा विश्‍वास शिरोडकर यांनी व्यक्त केला.

Mhaisal Dam Goa
Mayem Lake: जगप्रसिद्ध मये तलावाला प्रतीक्षा पर्यटकांची; गतवैभवासाठी विकास आवश्यक

पुरातन मंदिराचे बांधकाम

शिरोडा गावात 500 पेक्षा जास्त वर्षांची प्राचीन मंदिरे आहेत. यातील अनेक मंदिरे लोकांना माहीत देखील नाहीत. अशा मंदिराचा शोध घेऊन या मंदिराचे बांधकाम हाती घेतले जाणार आहे.

महामाया मंदिराची गर्भखोली, काराय येथील मंदिराची गर्भखोली बांधण्यासाठी आपण पुढाकार घेणार असल्याचे शिरोडकर यांनी सांगितले. सिध्दारच्या टेकडीवरील सिध्दपुरुष मंदिराकडे जाण्यासाठी पायऱ्यांचे बांधकाम केले जाईल, असे शिरोडकर म्हणाले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com