Mahadayi Water Dispute: म्हादईप्रश्नी मुख्यमंत्र्यांची महत्वाची माहिती; म्हणाले सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर....

गोव्याची कायदेशीर टीम दिल्लीत
Mahadayi Water Dispute
Mahadayi Water DisputeDainik Gomantak
Published on
Updated on

Mahadayi Water Dispute गोवा आणि कर्नाटकात गेल्या काही दिवसांपासून वादग्रस्त आणि असंतोषाचे कारण बनलेल्या म्हादई प्रकरणाविषयी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी महत्वाची माहिती दिली आहे.

उद्या म्हणजेच सोमवारी सर्वोच्च न्यायालयासमोर गोव्याची बाजू भरभक्कमपणे मांडली जाणार असल्याचे सावंत यांनी सांगितले आहे.

यासाठी गोव्याची कायदेशीर टीम आधीच दिल्लीत असून गोवा राज्याची बाजू जोरदारपणे मांडली जाईल. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयावर पूर्ण विश्वास असल्याचेही सावंत यांनी सांगितले आहे.

गोव्यात म्हादई हा विषय फारच संवेदनशील असून म्हादई वाचवण्यासाठी विविध संघटनांनी आंदोलन, रॅली, पथनाट्य, जनजागृतीपर कार्यक्रम राबवले आहेत. 18 जून रोजी क्रांतिदिनी ‘जलक्रांती’ची हाक देखील देण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Mhadei Water Dispute
Tarun Tejpal Supreme Court Latest
Karnataka Supreme Court Cases
Supreme Court Madayi Water Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com