मोरजी: पेडणे (Pernem) मतदारसंघातील (Pernem Constituency) गोरगरीब आणि गरजू नागरिकांच्या समस्या सोडविण्यासाठी आणि त्यांना मदतीचा हात देण्यासाठी मी नेहमीच पुढे असेन. (Helping Hand) तसेच पेडणे मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि त्यांचे प्रश्न अनेक वर्ष तसेच आहेत. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी पेडणेतील समस्या (Issues of Pernem) सोडविण्यासाठी लक्ष दिले नाही. मात्र मी पेडणे मतदारसंघातील समस्या आणि गरजवांताना मदतीचा हात देण्यासाठी नेहमीच पुढे असेन(Needy people), असे उद्गार पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रविण आर्लेकर यांनी काढले. (MGP Goa)
पेडणे मतदारसंघाचे मगो पक्षाचे नेते प्रवीण आर्लेकर यांच्या तर्फे पेडणे पालिकेच्या सफाई कर्मचाऱ्यांना पावसाळ्यात काम करण्यासाठी अॕपराॕन, जॕकेट व हातमोजे देण्यात आले. यावेळी पत्रकारांकडे प्रवीण आर्लेकर बोलत होते. यावेळी जयेश पालयेकर, राजन म्हापसेकर आदी उपस्थित होते. प्रवीण आर्लेकर पुढे म्हणाले, पेडणे मतदारसंघात अनेक समस्या आहेत. गेली अनेक वर्षे त्या सोडविल्या नाहीत. गोरगरीब जनता ही त्रस्त आहे. मात्र त्यांना कोणीही 'वाली' राहिलेला नाही. पेडणे मतदारसंघात अजूनही काही गावात रस्ते नाही.पाणीपुरवठा होत नाही. इब्रामपूर सारख्या गावात अनुसूचित जातीचे लोक राहत असलेल्या वस्तीत अजूनही शौचालये नाहीत. यावरुन पेडणेच्या जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधीनी कोणाचा विकास केला हे दिसून येते, असे प्रवीण आर्लेकर म्हणाले.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.