Goa Medical College: GMC चे घुमजाव? म्हणे 'ती' नोट सर्वांसाठी नव्हे अंतर्गत, काँग्रेसने मोदींना केले ट्विट

Goa Medical College: दरम्यान गाड्यांवरील जिन्नस न खाण्याबाबतच्या नोटिसीमुळे एकाच खळबळ उडाली होती.
Notice
Notice Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Medical College: जीएमसी आणि सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या बाहेरील गाड्यांवरील जिन्नस न खाण्याबाबत प्रशासनाने आपल्या कर्मचाऱ्यांकरिता नोटीस जारी केली होती.

मात्र ती नोटीस अंतर्गत असून लोकांसाठी नव्हती. अशा परिस्थितीत ती नोटीस कोणीतरी समाज माध्यमांवर व्हायरल केल्याची घटना घडल्यावर आता प्रशासनाने तो आदेश मागे घेत असल्याची दुसरी नोटीस जारी केली आहे.

दरम्यान गाड्यांवरील जिन्नस न खाण्याबाबतच्या नोटिसीमुळे एकाच खळबळ उडाली होती. गाडे मालक जनतेच्या आरोग्याशी खेळात असल्याच्या प्रतिक्रिया समाजमाध्यमांवर उमटल्या होत्या.

ज्याठिकाणी रुग्ण उपचारासाठी येतो त्याच हॉस्पिटलच्या बाहेर जर जोवाशी खेळ करण्याचे प्रकार होत असतील तर ही बाब गंभीर असल्याचेही बोलले जात होते.

मात्र अवघ्या काही तासातच जीएमसीचे नोडल अधिकारी डॉ.उदय काकोडकरांनी ती नोटीस मागे घेत असल्याचे जाहीर केली. या घटनेमुळे पुन्हा एकदा साशंकतेने वातावरण तयार झाले आहे.

काँग्रेस पक्षाने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टॅग करत गोवा वैद्यकीय महाविद्यालयाच्या सुपर स्पेशालिटी ब्लॉकच्या नोडल ऑफिसरने रस्त्यावरील खाद्यपदार्थांच्या स्टॉल्सद्वारे वापरल्या जाणाऱ्या खराब पाण्यावर प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकावर आरोग्यमंत्री विश्वजित राणे यांच्याकडून स्पष्टीकरण मागण्याची मागणी केली.

सार्वजनिक लोकांचे आरोग्य महत्त्वाचे नाही का? एफडीएने कारवाई का केली नाही, असा सवाल काँग्रेसने केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com