Goa Theft Case: तळे दुर्गाभाटमध्ये घरमालकाच्या मुलाला कोंडून चोरट्यांची लूटमार; 'अशी' घडली घटना, वाचा..

Goa Theft Case: गुरुवारी बांदेकर सपत्नीक घरी परतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आला
Goa Theft Case
Goa Theft CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Theft Case: तळे दुर्गाभाट येथे बुधवारी मध्यरात्री अडीच वाजण्याच्या सुमारास भर लोकवस्तीतील घरात चोरी झाल्याचा प्रकार घडला आहे. अज्ञात चोरट्याने घर मालकाच्या मुलाला खोलीत कोंडून चोरी केली. अशा प्रकारच्या चोरीमुळे परिसरात चर्चेला ऊत आला असून काहीसे भीतीचे वातावरणही तयार झाले आहे.

Goa Theft Case
कुत्रे मागे लागल्‍याने बैल उधळला, बाणावलीत फिरायला आलेली ब्रिटीश महिला बैलाने शिंग खुपसल्‍याने जखमी

मिळालेल्या माहिती नुसार तळे दुर्गाभाट येथील रहिवासी अशोक बांदेकर हे आपल्या पत्नीसह जत्रेनिमित्त कारवार येथे गेली होती तर घरात त्यांचा मुलगा एकटाच होता.

याच संधीचा फायदा घेऊन अज्ञात चोरटे मुख्य दरवाजा तोडून घरात शिरले. घरातील बांदेकर यांचा मुलगा ज्या खोलीत झोपला होता त्या खोलीला त्यांनी बाहेरून काडी लावली. तसेच घराच्या मागील दरवाजालाही काडी लावली आणि चोरट्यांनी आपले काम साधले.

बांदेकर यांच्या मुलाने खोलीचा दरवाजा उघडण्याचा प्रयत्न केला असता खोलीला बाहेरून कडी घातल्याचे त्याला समजले. मग त्याने त्यांच्या घरात रहाणाऱ्या भाडेकरूंना फोन केला असता त्यांच्याही खोल्याना बाहेरून कढी लावल्याचे आढळून आले.

एकंदरीत सर्व प्रकार लक्षात आल्यावर ते खोलीचा दरवाजा तोडून बाहेर आले आणि घटनेची खबर पोलिसांना दिली.

गुरुवारी दुपारी बांदेकर सपत्नीक घरी परतल्यावर हा सर्व प्रकार उघडकीस आल्यावर त्यांनी लगेचच नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये चोरीची तक्रार दाखल केली आहे.

दरम्यान बांदेकर यांच्या घराशेजारच्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात दोन संशयित आढळून आले असून फोंडा पोलिस फॉरेन्सिक पथक तसेच श्वान पथकाच्या साहाय्याने चोरट्यांचा छडा लावण्याचा प्रयत्न करत आहेत. या घटनेत चोरट्यांनी किती रकमेचा ऐवज लंपास केला हे अद्याप समजू शकलेले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com