नाताळ सणाच्या तोंडावर नारळाचे दर भडकलेलेच, पालेभाज्यांच्या दरातही वाढ; फळांना वाढली मागणी

Goa Market: राज्यात मागील सहा महिन्यांपासून नारळांचा तुटवडा भासत असून दरही भरमसाठ वाढले आहेत.
Goa Market
Goa MarketDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: राज्यात मागील सहा महिन्यांपासून नारळांचा तुटवडा भासत असून दरही भरमसाठ वाढले आहेत. राज्यात नाताळसण तोंडावर असताना नारळ मिळणे कठीण होत असून मध्यम आकाराचा एक नारळ ५० रुपयांना विकला जात आहेत.

सध्या मार्गशीर्षानिमित्त भाजी आणि फळांना मोठ्या प्रमाणात मागणी असल्याने भाजीपाल्याच्या किमती देखील वाढल्या आहेत. राज्यात कांदा ४० रुपये आणि टॉमेटो ५० रुपये प्रती किलो दराने विकले जात असून पालेभाज्यांच्या दरातही मोठ्या प्रमाणात झाली आहे.

अनेक भाज्या ५० रुपयांना तीन जुडी दराने विकल्या जात आहेत. सध्या भेंडी ८० रूपये, फ्लॉवर ५० रुपये दराने विकले जात आहेत. पणजी बाजारात मक्याची कणसे शंभर रुपयांना सहा विकली जात आहेत. इतर भाज्यांसहित फळांना देखील चांगली मागणी वाढली असून फळांच्या दरातही १० टक्क्यांनी वाढ झाली आहे.

Goa Market
Goa Assembly Winter Session 2026: विधानसभेचे हिवाळी अधिवेशन हडफडे अग्निकांडामुळे तापणार? 12 ते 16 जानेवारीपर्यंत चालणार कामकाज

अंडी खाताहेत भाव

सध्या नाताळ सण आणि वाढत्या थंडीच्या अनुषंगाने अंड्यांना मागणी वाढली आहे. सध्या राज्यात शंभर रुपये डझन दराने अंडी विकली जात असून येत्या काळात वर्ष अखेरीस अजूनही मागणी वाढणार असल्याने सध्या महिनाभर तरी अंड्याचे वाढलेले दर कायम राहणार असल्याचे विक्रेते सांगतात.

Goa Market
PSI Recruitment Goa: महिला 'पीएसआय' भरतीत मोठी गळती, उमेदवार नाराज; 216 पैकी केवळ 13 उमेदवार पात्र, नियम बदलाचा फटका

गावठी भाज्यांना मागणी

ग्रामीण भागात लालभाजी, मुळा व इतर भाज्या पिकवल्या जात आहे, परंतु अजून आवश्‍यक तेवढे पीक आलेली नाही. आता कुठे काही विक्रेते स्थानिक भाज्या विक्रीसाठी आणत असून त्यांना चांगली मागणी आहे. बाजारात सध्या अळूमाडी आणि काटेकणगी मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी येत असून त्यांची खरेदी देखील आवर्जून केली जात आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com