Goa Marigold Production Increases: इस्रायली तंत्रज्ञानामुळे यंदा झेंडू उत्‍पादनात 240 टनांनी वाढ! कृषी खात्‍याचा दावा; लागवड क्षेत्रही वाढलं

indo israel centre of excellence kodar ponda: इस्रायलच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यंदा राज्यातील झेंडू उत्पादनाला मोठा फायदा मिळाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूचे उत्पादन तब्बल २४० टनांनी वाढलेले आहे.
indo israel centre of excellence kodar ponda
Goa Marigold Production IncreasesDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

पणजी: ‘‘इस्रायलच्या आधुनिक तंत्रज्ञानाचा यंदा राज्यातील झेंडू उत्पादनाला मोठा फायदा मिळाला असून, गतवर्षीच्या तुलनेत यंदा झेंडूचे उत्पादन तब्बल २४० टनांनी वाढलेले आहे. झेंडू लागवडीखालील क्षेत्रात वाढ झाल्याने उत्पादनातही मोठी वाढ झाली’’, असे कृषी खात्याचे संचालक चंद्रहास देसाई यांनी सोमवारी ‘गोमन्तक’शी बोलताना सांगितले.

‘‘आतापर्यंत राज्यातील सरासरी ८० हेक्टर जमिनीवर झेंडूची (Marigold) लागवड होत होती. यंदा मात्र सरकारने कोडार–फोंडा येथील सरकारी कृषी फार्ममध्ये १२ कोटी रुपये खर्चून उभारण्यात आलेल्या ‘इंडो-इस्रायल सेंटर ऑफ एक्सलन्स’चा लाभ शेतकऱ्यांना करून दिला होता. त्यामुळे यावर्षी झेंडू लागवडीखालील क्षेत्रात सुमारे ४० हेक्टरनी वाढ होऊन १२० हेक्टर जमिनीत शेतकऱ्यांनी झेंडूची लागवड केलेली होती. या सेंटरमध्ये इस्रायली तंत्रज्ञान वापरून तयार केलेली चार लाख रोपे शेतकऱ्यांना दिली होती.

त्यामुळे कृषी खात्याचे रोपांसाठीचे १२ लाख रुपयेही वाचले’’, असे देसाई यांनी सांगितले. ‘‘राज्यात प्रत्येक हेक्टरमध्ये सरासरी सहा टन झेंडूचे उत्पादन होते. त्यानुसार ८० हेक्टरमध्ये आतापर्यंत ४८० टन उत्पादन होत होते. यंदा १२० हेक्टरमध्ये लागवड झाल्याने त्यातून २४० टन अधिक म्हणजेच ७२० टन उत्पादन मिळालेले आहे’’, असे देसाई म्हणाले.

indo israel centre of excellence kodar ponda
Marigold Goa: 'उठ रे, चल रे, झेप घे कर निश्चय भिड जा रे'! पावसाच्या आव्हानांवर मात करत गोव्यातील शेतकऱ्याने फुलवला झेंडू; Video

यापुढे शेतकऱ्यांना गोव्यातील रोपे

‘‘विविध प्रकारच्या भाज्या तसेच फुलांच्या शेतीसाठी आवश्यक असलेल्या रोपांची आयात कृषी खाते महाराष्ट्र, कर्नाटक तसेच इतर राज्यांतून करीत होते. परंतु, यंदापासून स्थानिक शेतकऱ्यांना गोव्याच्या प्रयोगशाळेत तयार झालेल्या रोपांचे वितरण करण्याचे निश्चित करण्यात आले आहे. त्यामुळे पुढील काळात भाज्यांसह विविध प्रकारच्या फुलांच्या उत्पादनातही निश्चित वाढ होईल’’, असा विश्वासही चंद्रहास देसाई यांनी व्यक्त केला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com