Sernabatim Beach: बेकायदेशीर बांधकामाला ऊत; वाळूच्‍या टेकड्यांचा विध्‍वंस करत सेर्नाभाटी किनार्‍याचे विद्रुपीकरण

Illegal Construction किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाने हस्‍तक्षेप करण्‍याची मागणी
Sernabatim Beach
Sernabatim BeachDainik Gomantak
Published on
Updated on

Illegal Construction on Sernabatim Beach सेर्नाभाटी येथील किनार्‍यावर बेकायदेशीर बांधकाम उभारले जात असून त्‍यासाठी वाळूच्‍या टेकड्यांचा विध्‍वंस केला गेला आहे. ही तक्रार कोलवा सिव्‍हीक फोरमच्‍या सचिव आणि पर्यावरण चळवळीतील आघाडीच्‍या कार्यकर्‍त्‍या ज्‍युडिथ आल्‍मेदा यांनी गाेवा किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाकडे केलीय. प्राधिकरणाने या कामात हस्‍तक्षेप करुन ते त्‍वरित बंद करावे अशी मागणी केली आहे.

दरम्‍यान, आज या भागातील सामाजिक कार्यकर्ते वॉरन आलेमाव यांनी या ठिकाणी भेट देऊन कामाची पहाणी केली. एका हॉटेल व्‍यावसायिकाने आपल्‍या बांधकामासाठी हा विध्‍वंस केला आहे आणि हे बांधकाम करताना या हॉटेल व्‍यावसायिकाने स्‍थानिक पंचायतीलाही अंधारात ठेवल्‍याचे म्‍हटले आहे. या ठिकाणी जेसीबीचा वापर करुन सुमारे सात मीटर खोल खणले गेले आहे असे आलेमाव यांनी सांगितले.

आल्‍मेदा यांनी काल ज्‍या ठिकाणी हे काम चालू आहे त्‍याची छायाचित्रे आणि व्‍हिडिओ काढून किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाच्‍या सदस्‍य सचिवांना पाठविले होते. मडगाव येथील उपविभागीय न्‍यायदंडाधिकार्‍यांचेही त्‍यांनी या प्रकाराबद्दल लक्ष वेधले होते.

Sernabatim Beach
land Acquisition : शेती, खाजन जमिनीत भूसंपादनाला विरोध ; पुलामुळे शेती नष्ट होण्याची भीती

हे काम चालू आहे ते पूर्णत: बेकायदेशीर असून पर्यावरणावर विपरित परिणाम करणारे आहे असे आल्‍मेदा यांनी म्‍हटले असून संबंधित अधिकार्‍यांनी यावर लक्ष घातले नाही तर आपण न्‍यायालयाकडे दाद मागू असे त्‍यांनी म्‍हटले आहे.

दरम्‍यान, ज्‍या हॉटेल व्‍यावसायिकाने हे बांधकाम केले आहे त्‍याने किनारपट्टी व्‍यवस्‍थापन प्राधिकरणाची परवानगी घेतलेली नाही असा आरोप करुन या व्‍यावसायिकाने किनार्‍यावर जेसीबी आणण्‍यासाठी बेकायदेशीर रस्‍ता केला आणि नंतर वाळूच्‍या टेकड्या कापल्‍या असून या बेकायदेशीर कामाची प्राधिकरणाने त्‍वरित दखल घेऊन कारवाई करावी अशी मागणी वॉरन आलेमाव यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com