Rajdhani Express News: 'राजधानी एक्सप्रेसला जेवण पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे किचन गलिच्‍छ, आस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल

रावणफोंड येथील प्रकार : ‘एफडीए’ने ठोकले टाळे
Margao Railway News:
Margao Railway News: Dainik Gomantak
Published on
Updated on

Rajdhani Express News 'राजधानी एक्सप्रेस’सारख्या प्रतिष्ठित रेल्वेमध्ये खाद्यपदार्थ पुरविणाऱ्या कंत्राटदाराचे किचन अत्यंत गलिच्छ असल्याचे अन्‍न व औषध प्रशासनाने केलेल्‍या पाहणीत आढळून आले. त्‍यामुळे या आस्‍थापनाला तत्‍काळ टाळे ठोकण्‍यात आले.

रावणफोंड-मडगाव येथील ‘मेसर्स ब्रंदावन फुड्स’ या आस्थापनाला हे कंत्राट दिले होते. मात्र, या आस्थापनाकडे ‘एफएसएसएआय’चा परवाना नव्हता. ज्या ठिकाणी हे खाद्यपदार्थ तयार केले जात होते, ती जागा उघड्यावर होती आणि खालून घाण पाणी वाहत असल्याचे दिसून आले.

खाद्यपदार्थ बनविणारी भांडीही अस्वच्छ होती. हे सर्व पाहिल्यावर या आस्थापनाला तत्काळ टाळे ठोकण्यात आले. या आस्थापनाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. रिचर्ड नोरोन्हा यांच्या नेतृत्वाखाली आबेल रॉड्रिग्स, स्नेहा नाईक, किन कार्वाल्हो आणि अभिषेक नाईक यांच्या पथकाने ही कारवाई केली.

Margao Railway News:
Goa Tiger Reserve: न्यायालयाने निकाल दिला! तरीही मुख्यमंत्री म्हणतात, ''अजून व्याघ्र प्रकल्पावर अभ्यास करायचाय!''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Jambavali Dhyan Foundation Goshala
Fake Traffic Challan Scam
 Goa Facebook Part Time Job Scam
Goa Dubai Flights
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com