Goa | Margao Municipality
Goa | Margao MunicipalityDainik Gomantak

Goa: मडगाव नगरसेवकावर हफ्ता वसुलीचा स्थानिकाचा आरोप!

Goa: मडगावातील एका शहाळेविक्रेत्याने एका नगरसेवकावर हफ्ता घेत असल्याचा आरोप केला आहे.
Published on

Goa: मडगावातील एका शहाळेविक्रेत्याने एका नगरसेवकावर हफ्ता घेत असल्याचा आरोप केला आहे. हा नगरसेवक गेल्या आठ-नऊ महिन्यांपासून दर महिन्याला साडेतीन हजार रुपयांचा हफ्ता घेतो असे त्‍याने म्‍हटले आहे. मात्र 'त्‍या' नगरसेवकाने आरोप फेटाळून लावला आहे.

दरम्यान, संबंधित नगरसेवक म्‍हणाला, आपल्या प्रभागात जे लोक रस्‍त्‍यावर बसून विक्री करतात किंवा ज्यांच्यामुळे वाहतुकीला, पादचाऱ्यांना अडथळा निर्माण होतो, अशा विक्रेत्यांवर कारवाई (Action) केली आहे. त्यांचे साहित्‍यही जप्त केले आहे.

त्यामुळेच ते आपल्यावर विनाकारण आरोप करीत आहेत. जर हा विक्रेता हफ्ता देत असेल तर मग त्याचे साहित्‍य नगरपालिकेने (Municipality) का जप्त केले, असा प्रतिसवाल त्‍याने केला.

Goa | Margao Municipality
Goa Road: गोव्यातील सर्वाधिक अपघातप्रवण क्षेत्रे फोंड्यात

तसेच, एका विक्रेत्याने नगरसेवकावर हफ्ता घेण्याचा आरोप करणे ही गंभीर बाब आहे. त्याची चौकशी करणे गरजेचे आहे, अशी मागणी मिलाग्रीस फर्नांडिस नामक एका स्थानिकाने व ग्रामस्‍थांनी केली आहे. काल मंगळवारी नगरपालिकेच्या कर्मचाऱ्यांनी त्या विक्रेत्याची शहाळी जप्त केली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com