Krishna Salkar: मडगावातील घाऊक मासळी मार्केटचे लवकरच स्थलांतर

Krishna Salkar: 60 टक्के काम पूर्ण : पुढील आठवड्यापर्यंत निर्णय
Krishna Salkar | Goa News
Krishna Salkar | Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Krishna Salkar: एसजीपीडीएच्या घाऊक मासळी मार्केटच्या स्वच्छता कामास आज अध्‍यक्ष आमदार कृष्णा (दाजी) साळकर यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्‍यात आला. या प्रसंगी बोलताना त्यांनी सांगितले की, नव्या मासळी मार्केटच्या इमारत बांधकामाचे काम 60 टक्के पूर्ण झाले असून जीएसआयडीसी मार्केटच्‍या उर्वरित जमिनीचा ताबा मागत आहे. त्यामुळे काम जलदगतीने करता येईल. पुढील आठवड्यापर्यंत घाऊक मासळी मार्केट स्थलांतरित करण्याचा निर्णय घेतला जाईल.

जेव्हा हा मार्केट प्रकल्प पूर्ण होईल, तेव्हा येथील सर्व समस्या सुटतील. सध्‍या तरी सध्‍याचेच घाऊक मासळी मार्केट दुसरीकडे तात्पुरते स्थालांतरित करण्याचा निर्णय पुढील आठवड्यात घेतला जाईल.

यासंदर्भात आपण मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्याशी चर्चा केली आहे. स्थलांतरासाठी जी जागा पाहिली आहे, ती स्वच्छ करण्यास तसेच साधनसुविधा उपलब्ध करण्यास दीड कोटी रुपयांची आवश्यकता आहे. केवळ सहा महिन्यांसाठी एवढी रक्कम खर्च करणे शक्य आहे काय, याची पडताळणी संबंधित अधिकारिणी करून निर्णय घेणार असल्याचे साळकर यांनी सांगितले.

दरम्यान, गोमंतकीय मासळीविक्रेत्यांना शुल्काची 50 टक्के रक्कम कमी केली होती. तरीसुद्धा त्यांना ती आणखी कमी करून पाहिजे. त्यावर अधिकारिणीद्वारे योग्य तो निर्णय घेतला जाईल, असे साळकर यांनी सांगितले.

Krishna Salkar | Goa News
Goa University: दर्जेदार शिक्षणासाठी गोवा विद्यापीठाचं मोठं पाऊल, आंतरराष्ट्रीय विद्यापीठाशी केला करार

एसजीपीडीएला 12 ते 13 लाखांचा महसूल

सध्‍या सोपो कराद्वारे एसजीपीडीएला महिन्याला 12 ते 13 लाख रुपयांचा महसल मिळतो. तरीसुद्धा 31 जानेवारी 2023 पर्यंत सोपो कर जमा करणाऱ्या कंत्राटदारासाठी निविदा काढून प्रक्रिया पूर्ण करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाईल, असेही साळकर यांनी सांगितले. दर आठवड्याला कमीत कमी एकदा तरी मार्केटमध्ये पाण्याचे फवारे मारण्याचा व ग्रॅनाईट दगड पसरुन परिसर स्वच्छ ठेवण्याचा आपण कंत्राटदाराला आदेश दिला आहे, असेही ते म्‍हणाले.

"घाऊक मासळी मार्केट स्थलांतरासाठी जी जागा पाहिली आहे, ती स्वच्छ करण्यास तसेच साधनसुविधा उपलब्ध करण्यास दीड कोटी रुपयांची गरज आहे. केवळ सहा महिन्यांसाठी एवढी मोठी रक्कम खर्च करणे शक्य आहे काय, याची पडताळणी संबंधित अधिकारिणी करून निर्णय घेणार आहे."

- दाजी साळकर, एसजीपीडीए अध्‍यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com