Savio Coutinho Garbage Problum: सोनसोड्यावरील कचऱ्याचा भराव टाकणे तत्काळ थांबवा

Savio Coutinho Garbage Problum: मडगावातील ज्येष्ठ नागरिकांची निदर्शने
Savio Coutinho |Goa News
Savio Coutinho |Goa NewsDainik Gomantak

Garbage Problum: मडगाव रवींद्र भवन शेजारी सोनसोड्यावरील कचरा घालून भराव टाकण्याचे जे काम चालू आहे ते पूर्णतः चुकीच्या पद्धतीने सुरू असून या भागात इनर्टच्या नावाखाली जो कचरा टाकण्यात आला आहे, त्याची शास्त्रीय पद्धतीने चाचणी करावी, अशी मागणी शॅडो कौन्सिलने निदर्शने करून केली. या संदर्भात लवकरच उच्च न्यायालयाला पत्र पाठवणार असल्याचे या संघटनेचे निमंत्रक सावियो कुतिन्हो यांनी सांगितले.

आज शॅडो कौन्सिलचे कार्यकर्ते आणि ज्येष्ठ नागरिकांनी या ठिकाणी तोंडाला काळे कपडे बांधून मूक निदर्शने केली. या वेळी प्रसार माध्यमांशी बोलताना कुतिन्हो यांनी सांगितले,की या भागात इनर्टच्या नावाखाली सरळ सरळ प्लास्टिक मिश्रित कचरा टाकला जात आहे.

कचऱ्यामुळे दुर्गंधी

मडगावच्या प्रवेशाचे ठिकाण असलेल्या या परिसराला एकेकाळी गोव्याचे अथेंस म्हटले जायचे. आज तोच परिसर दुर्गंधीने व्यापला आहे. कुठ्ल्याही अधिकारिणीचे लक्ष त्याकडे जात नाही ही दुर्दैवी बाब आहे, अशी टीका जुझे मारिया मिरांडा यांनी यावेळी केली.

Savio Coutinho |Goa News
Mopa Airport: मोपा विमानतळाच्या नावाचा वाद पुन्हा सुरु; वाळपईत धरणे आंदोलन

न्यायालयीन आदेशाचा गैरफायदा !

पावसाळ्यात त्यामुळे या भागातील पाण्याचे स्त्रोत प्रदूषित होणार असल्याची भीती सावियो कुतिन्हो यांनी व्यक्त केली.सोनसोड्यावरील जुना साठून असलेला कचरा फेब्रुवारी महिन्यापर्यंत साफ करा, असा आदेश उच्च न्यायालयाने दिलेला असून त्याच आदेशाचा लाभ उठवून याठिकाणी हा भराव घातला जात आहे. यामुळे या सर्व परीसरात दुर्गंधी पसरली आहे,असेही कुतिन्हो यांनी सांगितले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com