Goa University: विद्यार्थी संघ निवडणुकीत अभाविपचा दणदणीत विजय

Goa University: अध्यक्षपदी अक्षय शेट तर सचिवपदी सुदीप नाईक
Goa University
Goa UniversityDainik Gomantak
Published on
Updated on

Goa University: गोवा विद्यापीठ विद्यार्थी संघ निवडणूक दि. 10 जानेवारी 2024 रोजी पार पडली. या निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेने विद्यापीठातील 9 पैकी 8 जागांवर दणदणीत विजय मिळवला आहे.

गोवा विद्यापीठाच्या अध्यक्ष व सचिव पदावर अनुक्रमे अक्षय शेट व सुदीप नाईक विजयी झाले आहेत. तसेच सदस्य पदी मंदार देसाई, शुभम मळीक, आकाश नाईक, सुबेश नाईक गांवकर, प्रभा नाईक आणि मयंक प्रभुदेसाई विजयी झाले आहेत.

Goa University
Candolim Murder Case: 4 वर्षीय मुलाच्या खून प्रकरणात नवा ट्विस्ट! हॉटेल रूममध्ये आढळलेल्या औषधाच्या बॉटलमुळे खळबळ

नवनिर्वाचित अध्यक्ष अक्षय शेट शिरोडा येथील आयुर्वेदिक महाविद्यालयात अंतिम वर्षाचे शिक्षण घेत आहेत. अभाविप चे दक्षिण गोवा जिल्हा संयोजक आहेत.

2019 पासून अभाविपच्या कामात आहेत. काणकोण शहरमंत्री, दक्षिण गोवा जिल्हा सहसंयोजक अशा जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या आहेत.

नवनिर्वाचित सचिव सुदीप नाईक साखळी येथील सरकारी महाविद्यालयात गणित विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहेत.

अभाविप उत्तर गोवा जिल्हा संयोजक आहेत. 2018 पासून अभाविप च्या कामात आहेत. उत्तर गोवा जिल्हा महाविद्यालय प्रमुख अशा जबाबदाऱ्या पार पाडल्या आहेत.

Goa University
सासूनं फोडलं मांजरीचं डोकं, सूनेनं दाखलं केली तक्रार; फोंड्यातील घटनेची राज्यात चर्चा

अभाविप च्या विजयाबद्दल राष्ट्रीय महामंत्री याज्ञवल्क्य शुक्ल, कोंकण प्रदेश अध्यक्ष प्रा. श्रीकांत दुदगीकर, प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई यांनी अभिनंदन केले आहे.

अभाविप कोंकण प्रदेश मंत्री संकल्प फळदेसाई म्हणाले की "गोवा विद्यापीठ निवडणुकीत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचा हा विजय ऐतिहासिक आहे.

गोव्यातील विद्यार्थी हे राष्ट्रीय विचारांच्या सोबत आहेत. गोव्यातील विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अभाविप कार्यकर्ते सदैव प्रयत्नशील असतील."

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com