Ranji Trophy Cricket Tournament: खेळपट्टीची साथ आणि चंडीगडच्या निष्प्रभ गोलंदाजीवर गोव्याची उच्चांकी धावसंख्या

Ranji Trophy Cricket Tournament: 7 बाद 618: दीपराजचे पहिलेच शतक, सुयशचे द्विशतक हुकले, अर्जुनचे अर्धशतक
Ranji Trophy Cricket Tournament
Ranji Trophy Cricket TournamentDainik Gomantak

Ranji Trophy Cricket Tournament: फलंदाजांना साथ देणारी खेळपट्टी, साफ निष्प्रभ ठरलेली चंडीगडची गोलंदाजी याचा लाभ उठवत गोव्याने शनिवारी पर्वरी येथे रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेतील आपली उच्चांकी धावसंख्या नोंदविली. पहिला डाव 7 बाद 618 धावांवर घोषित करून यजमानांनी सामन्यावर वर्चस्व राखले.

चंडीगडने दुसऱ्या दिवसअखेर 1 बाद 73 धावा केल्या. अर्स्लान खान याचा ईशान गडेकरने, तर अर्पितसिंग पन्नू याचा विजेश प्रभुदेसाई याने झेल पकडला असता, तर चंडीगडची स्थिती आणखीनच दयनीय झाली असती. पाहुणा संघ अजून 545 धावांनी मागे आहे.

Ranji Trophy Cricket Tournament
Panjim Smart City: पर्रीकरांविषयी आदर व्यक्त; मात्र बाबूश यांच्यावरच्या कारवाईबाबत भाजपचे मौन

उपकर्णधार दीपराज गावकर (नाबाद 115 धावा, 101 चेंडू, 15 चौकार, 4 षटकार) याने रणजी क्रिकेट कारकिर्दीतील पहिले शतक नोंदविले.

कालचा नाबाद शतकवीर सुयश प्रभुदेसाई (197 धावा, 364 चेंडू, 18 चौकार, 1 षटकार) याचे वैयक्तिक दुसरे द्विशतक अवघ्या तीन धावांनी हुकले, तर अर्जुन तेंडुलकरने (70 धावा, 60 चेंडू, 6 चौकार, 4 षटकार) फटकेबाजी करताना अर्धशतकाची नोंद केली, तसेच राहुल त्रिपाठीच्या 40 आणि कर्णधार दर्शन मिसाळच्या 46 धावांमुळे गोव्याने धावांचा डोंगर उभारला.

संक्षिप्त धावफलक

गोवा, पहिला डाव (३ बाद २६७ वरून): १६० षटकांत ७ बाद ६१८ घोषित (सुयश प्रभुदेसाई १९७, राहुल त्रिपाठी ४०, दर्शन मिसाळ ४६, दीपराज गावकर नाबाद ११५, अर्जुन तेंडुलकर ७०, मोहित रेडकर नाबाद १४, जगजित सिंग २-७९, राजअंगद बावा १-४५, अर्पितसिंग पन्नू १-१३७, अर्स्लान खान १-४१, कुणाल महाजन १-४१).

चंडीगड, पहिला डाव: १८ षटकांत १ बाद ७३ (अर्स्लान खान नाबाद ४१, हरनूर सिंग २३, अर्पितसिंग पन्नू नाबाद ५, मोहित रेडकर १-१८).

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com