Sanjay School Porvorim: संजय स्कूल व्होकेशनल सेंटरच्या बंदीविरुद्ध आंदोलन छेडत पालकांनी दिलाय 'हा' इशारा

Sanjay School Porvorim: अन्‍यथा पर्पल फेस्‍तच्‍या ठिकाणीही धडक देऊ- पालकांचा इशारा
Sanjay School Porvorim
Sanjay School PorvorimDainik Gomantak
Published on: 
Updated on: 

Sanjay School Porvorim: पर्वरी येथील संजय स्कूल व्होकेशनल सेंटर अद्याप सुरू न केल्‍याच्‍या निषेधार्थ दिव्यांग विद्यार्थ्यांच्या पालकांनी शनिवारी येथील आझाद मैदानावरील क्रांती स्मारकामसोर धरणे आंदोलन केले.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या प्रकरणी हस्तक्षेप करावा, त्‍यात यश न आल्‍यास पर्पल फेस्‍तच्या ठिकाणी आंदोलन छेडू, असा इशारा पालकांनी दिला. दरम्‍यान, चार महिन्यांपूर्वी संजय स्कूलच्या दुसऱ्या मजल्यावरून पडून एका दिव्यांग विद्यार्थ्याचा मृत्यू झाला होता, तेव्हापासून हे केंद्र बंद आहे.

या आंदोलनाविषयी गोवा दिव्यांग हक्क संघटनेचे प्रमुख ॲव्हिलिनो डिसा यांनी सांगितले की, संजय स्कूलची इमारत असुरक्षित बनल्यामुळे मागील तीन-चार महिने बंद आहे.

आपण पालकांसह मागील महिन्यात व्यवस्थापकीय संचालकांना भेटलो होतो. तेव्हा त्यांनी काही गोष्टींना होकार दिला होता. परंतु विद्यार्थ्यांचे वर्ग काही सुरू झाले नाहीत.

आंदोलनात सहभागी झालेल्या पालकांनी सांगितले की, गेले चार महिने घरी असलेल्या मुलांना कुठेतरी सुविधा उपलब्ध करून द्यावी. पर्पल फेस्तवर मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो, मग नवी इमारत बांधण्यासाठी का खर्च केला जात नाही? असा सवाल त्यांनी केला.

'त्यांना' वेळच नाही-

वीस दिवसांपूर्वी मी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांच्‍याकडे शिक्षणमंत्री म्हणून दहा मिनिटे भेटण्यास वेळ मागितली होती. परंतु पालकांना दहा मिनिटेही भेटण्यास त्यांना वेळ मिळाला नाही.

पाचच दिवसांपूर्वी आम्ही समाजकल्याणमंत्री सुभाष फळदेसाई यांच्‍याकडेही भेट मागितली, पण त्‍यांनाही वेळ मिळाला नाही. अशाने हा प्रश्‍‍न सुटणार तरी कसा?


- ॲव्हिलिनो डिसा, गोवा दिव्यांग हक्क संघटनेचे प्रमुख

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Porvorim Flyover
Goa Casino Ship Case
Karapur One Goa Project Protest
Jerson Gomes Attack Latest News
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com