Water Shortage In Goa: रेईश मागूस पंचायतीत पाणी प्रश्न पेटला; स्थानिकांचा पंचायतीवर धडक मोर्चा

Water Shortage In Goa: पंचायतीकडे मुबलक पाणी आहे परंतु ते या भागात येऊ घातलेल्या मेगा प्रोजेक्टला पंचायत पाणी पुरवत आहेत- ग्रामस्थ
Water Shortage
Water Shortage Dainik Gomantak
Published on
Updated on

Water Shortage In Goa: रईश मागूस पंचायत क्षेत्रातील घरांना गेल्या आठवडाभरापासून पाणी टंचाईची समस्या भेडसावत असून गुरुवारी स्थानिकांचा रोष पाहायला मिळाला. वेरे ग्रामस्थांसहित स्थानिकांनी पंचायतीवर अक्षरशः धडक मोर्चा दिला.

स्थानिकांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यासाठी वॊर्ड मेम्बर आणि सरपंच गैरहजर असल्याने आणि उपस्थित असलेल्या सचिवांनी त्यांच्या प्रश्नांची उत्तरे देण्यास असमर्थता दाखवल्याने स्थानिकांच्या संतापाची तीव्रता अधिकच वाढलेली पाहायला मिळावी.

Water Shortage
Yuri Alemao: सरकारी नोकऱ्यांसाठी कोकणी भाषेचे 'शैक्षणिक ज्ञान' अनिवार्य करा

पंचायतीकडे मुबलक प्रमाणात पाणी आहे परंतु ते सोडत नसून या भागात येऊ घातलेल्या मेगा प्रोजेक्टला पंचायत पाणी पुरवत आहे.

वेरे, नेरुल या भागात पाण्याची समस्या गेले बरेच दिवस असून तिलारीच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या कळंगुट, शिवोली, पर्वरी, थिवी, म्हापसा भागात कधीच पाणी टंचाई जाणवत नाही मग आमच्याच गावातील ग्रामस्थांना पाणी का नाही असा उद्विग्न सवाल सामाजिक कार्यकर्ते राजेश दाभोलकर यांनी यावेळी उपस्थितांनी केला.

पंचायतीतील ग्रामस्थांच्या मूलभूत समस्या जर सोडवता येत नसतील तर राजीनामा द्या. पंचायत दर आठ दिवसातून एकदा पाणी सोडत असून दैनंदिन कामकाजासाठी पाण्याचा तुटवडा जाणवत आहे आणि याचा फटका घरातील स्त्रियांना मोठ्या प्रमाणावर बसतोय.

त्यामुळेच होणाऱ्या त्रासाबद्दल महिलांनी बोलले पाहिजे. पंचायतीच्या ग्रामसभेत महिलांनी सहभाग वाढवावा, आपले प्रश्न मांडावेत असे यावेळी स्थानिक महिलांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com