PM Vishwakarma Scheme Goa: 'पीएम विश्वकर्मा' साठी पदवी सोबतच कामाचा अनुभव आवश्यक- सावंत

PM Vishwakarma Scheme Goa: राबणाऱ्या प्रत्येक हाताला काम देणारं हे सरकार असून अजूनही काहीजणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार
PM Vishwakarma Scheme Goa
PM Vishwakarma Scheme GoaDainik Gomantak
Published on
Updated on

PM Vishwakarma Scheme Goa: केंद्रसरकारने हस्तकारागिरांसाठी सप्टेंबर 2023 साली पीएम विश्वकर्मा हि योजना सुरु केली असून या योजनेअंतर्गत 100% ऑनबोर्डिंग पूर्ण करणारे गोवा हे देशातील एकमेव राज्य आहे.

गोव्यात गुरुवारी पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात झाली असून या कार्यक्रमासाठी केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची विशेष उपस्थिती लाभली.

यावेळी मुख्यमंत्री प्रमोद सावंत आपले मनोगत व्यक्त करताना म्हणाले, ''पीएम विश्वकर्मा प्रशिक्षण केंद्राची सुरुवात देशात प्रथम गोव्याने केली आहे. कौशल्य विकासात १८ शाखांतून प्रशिक्षण दिले जाईल.

PM Vishwakarma Scheme Goa
Goa Traffic Jam: पणजीतील वाहतूक कोंडी संपणार कधी?

तसेच नोकरीसाठी राज्य सरकारने 32 इंडस्ट्रिजसोबत करार केला आहे त्यामुळे आता फक्त पदवी मिळवली म्हणजे नोकरी मिळणार नाही तर त्यासोबत किमान एका वर्षाचा कामाचा अनुभव किंवा अप्रेटिशीप असणे आवश्यक असेल अशी माहिती मुख्यमंत्री सावंत य‍ांनी दिली.

हे रोजगार निर्माण करणारं सरकार असून आम्ही दहा हजार युवकांना रोजगार देण्याचा संकल्प करत सुमारे 9 हजार युवकांना नोकर्‍या प्रदान केल्या आहेत.

कारण राबणाऱ्या प्रत्येक हाताला काम देणारं हे सरकार असून अजूनही काहीजणांसाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सोबतच काम करणार्‍यांची नोंदणी करून त्यांना ओळखपत्र देण्यात आले असल्याची माहिती मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनी दिली.

नारीशक्ती, युवाशक्ती, किसानशक्ती व गरीब कल्याण या चार तत्वांवर सरकारचे काम सुरू असूनहर घर जल, प्रत्येक घरी शौचालय, हर घर फायबरसह हरघर कौशल्य देण्याचा प्रयत्न राज्य सरकारचा आहे, असे मुख्यमंत्र्यांकडून सांगण्यात आले. या कार्यक्रमावेळी गुरु सन्मान अंतर्गत विविध क्षेत्रातील कारागिरांचा सत्कार करण्यात आला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com