Anurag Sing
Anurag Sing Dainik Gomantak

Vasco Accidental Death: सिलिंडर स्फोट प्रकरणी नौदल अधिकारी अनुराग सिंगला 6 दिवसांची पोलिस कोठडी

Vasco Accidental Death: गर्भवती महिलेच्या मृत्यूप्रकरणी वास्को प्रथम श्रेणी न्यायालयाने जारी केला आदेश
Published on

Vasco Accidental Death: वास्को - नवेवाडे येथे 18 नोव्हेंबर 23 रोजी सिलिंडर स्फोटात मृत्यू झालेल्या चार महिन्याची गरोदर महिला शिवानी अनुराग सिंग हिच्या मृत्यू प्रकरणी, शिवनीचा पती अनुराग श्यामलाल सिंग राजवंत याला शुक्रवार (दि.5) उशिरा रात्री अटक केली.

सदर आरोपी अनुराग यालाहुंडाबळी प्रकरणी पोलिसांनी अटक करून त्याला शनिवार (दि.6) रोजी वास्को प्रथम श्रेणी न्यायालयात हजर केले असता, न्यायालयाने त्याला सहा दिवसी पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

Anurag Sing
Goa Farming: जाणून घ्या, कमी खर्चात अधिक उत्पन्न देणारी गोव्यातील ही शेती पद्धती...

वास्को पोलिस स्थानकांचे निरीक्षक कपिल नायक या प्रकरणी अधिक तपास करीत आहे. आरोपी अनुराग सिंग राजावंत यांच्या विरोधात पोलिसांनी हुड्डा बळी भा.द.स 304 (बी) व 302 गुन्ह्याखाली गुन्हा दाखल केला आहे.

याप्रकरणाचा मागील संदर्भ असा कि, 18 नोव्हेंबर 2023 रोजी वास्को नवेवाडे येथे गॅस सिलिंडरचा स्‍फोट होऊन सव्वीस वर्षीय शिवानी अनुरागसिंग राजावत आणि तिची आई जयदेवी चव्हाण (50, मूळ ग्वाल्हेर-मध्यप्रदेश) यांचा मृत्यू झाला होता.

पंचनाम्यात गॅस सिलिंडरचा स्फोट होऊन हा प्रकार घडल्याचे समोर आले होते. तसेच पंचनामा करून शिवानी आणि आई जयदेवी यांचे मृतदेह वैद्यकीय तपासणीसाठी इस्‍पितळात पाठवला होता.

मात्र गॅस स्फोटात झालेला त्या दोघींचा मृत्यू हा घातपात असल्याचा आरोप शिवानीच्या भावाने आणि वडिलांनी केल्यावर या प्रकरणाला वेगळीच कलाटणी मिळाली होती.

त्या दोघींच्या वास्‍को पोलिसांनी अनुराग राजावत या नौदल अधिकाऱ्याच्‍या विरोधात खुनाचा गुन्‍हा नोंद करावा, अशी तक्रार शिवानीचे वडीलांनी केली होती.

या सर्व घडामोडीनंतर न्यायालयाने अनुराग याला सहा दिवसीय पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश जारी केला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com