BCG Vaccine: भारतात आता प्रौढांसाठी BCG लस; लसीकरण सुरु करणारे गोवा देशातील पहिले राज्य

BCG Vaccine: 2025 पर्यंत भारतात क्षयरोगाचे निर्मुलन करण्याच्या प्रयत्नांना वेग
BCG Vaccine
BCG VaccineDainik Gomantak
Published on
Updated on

BCG Vaccine: बीसीजी लसिकरण हे बालकांसाठी कित्येक दशकांपासून जगभरात सुरु आहे. आता भारताने प्रौढांसाठी बीसीजी लस तयार केली असून, लस देण्याची सुरवात गुरुवारी मडगावच्या दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात झाली.

त्यामुळे प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण सुरु करणारे गोवा हे देशातले पहिले राज्य ठरले आहे. पहिली लस टोचून घेण्याचा मान मडगावातील रहिवासी भारत नाईक यांना मिळाला.

आज (गुरुवारी) या लसीकरणाची सुरवात करण्यासाठी दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात भव्य कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी राष्ट्रीय आरोग्य अभियानच्या व्यवस्थापकीय संचालिका एल एस चॅंगसन, राष्ट्रीय क्षयरोग निर्मुलन कार्यक्रमाचे डॉ. अशोक बाबू, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल डॉ. राजीव बहल, डॉ. अतुल गोयल, आरोग्य खात्याच्या संचालिका गीता काकोडकर, दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळाचे मुख्य वैद्यकीय अधिकारी  डॉ. राजेन्द्र बोरकर, डॉ, राजेन्द्र जोशी आदी मंडळी उपस्थित होती.

BCG Vaccine
Mayem News : मयेतील खनिज वाहतुकीची कोर्टाने स्वेच्छादखल घ्यावी :‘गोवा फॉरवर्ड’

प्रौढांसाठी बीसीजी लस तयार करण्यामागे 2025 पर्यंत भारतातून क्षयरोगाचे पुर्ण निर्मुलन करण्याचे ध्येय असल्याचे डॉ. अशोक बाबू यानी सांगितले.

ही लस तयार करण्यासाठी दोन वर्षांपासुन संशोधन चालू होते. जवळ जवळ १२ कोटी सॅम्पलांची चांचणी करण्यात आली. गोव्यात याचे लसीकरण करुन त्याचा परिणाम कसा काय होतो याचा अभ्यास केला जाईल व त्यानंतर इतर राज्यांमध्ये लसिकरणाची सुरवात केली जाईल असेही डॉ. बाबू यानी स्पष्ट केले.

BCG Vaccine
Goa Theft Case: तळे दुर्गाभाटमध्ये घरमालकाच्या मुलाला कोंडून चोरट्यांची लूटमार; 'अशी' घडली घटना, वाचा..

श्रीमती एल एस चॅंगसन यानी सांगितले की 2025 पर्यंत भारतातुन क्षयरोगाचे निर्मुलन करण्याचे ध्येय पंतप्रधान नरेंद्र मोदी बाळगून आहेत.  भारतात जवळ जवळ 28 लाख क्षयरोगाचे रुग्ण आहेत.

दर वर्षी त्यात  2 टक्के घट दिसत असली तरी या घटाची टक्केवारी वाढविण्यासाठी आणखी जोरदार प्रयत्नांची गरज आहे असे त्या म्हणाल्या. जागतिक स्तरावर घटाची टक्केवारी १० टक्के असली तर जगाच्या घट आंकडेवारीच्या तुलनेत भारतात 16 टक्के रुग्णांमध्ये घट दिसत असल्याचेही त्या म्हणाल्या. 

डॉ. अतुल गोयल यानी प्रौढांसाठी बीसीजी लसीकरण सुरु केल्याबद्दल सरकारचे अभिनंदन केले व ही मोहीम यशस्वी होण्यासाठी शुभेच्छा दिल्या. त्यानी सांगितले की सकारात्मक विचार केला तर काहिही शक्य आहे. क्षयरोगाचे निर्मुलन करण्यासाठी पद्धतशीर मोहीम राबविणे आवश्यक आहे.

भारताला विकसीत देश म्हणवून घ्यायचे असेल तर क्षय रोग निर्मुलन महत्वाचे- डॉ. बहल

संशोधन कसे असावे व ते कसे करावे याचे सर्वोत्तम उदाहण म्हणजे प्रोढांसाठी तयार केलेली बीसीजी लस असल्याचे इंडियन कौन्सिल ऑफ मेडीकल रिसर्चचे डायरेक्टर जनरल डॉ. राजीव बहल यानी सांगितले.

त्यांनी सांगितले की भारताच्या या प्रयत्नांची व यशाची जगाच्या इतर देशांतही प्रशंसा होत आहे. सरकारने निक्षय मित्रा नावाची योजना सुरु केली असून या योजने अंतर्गत क्षय रुग्णांची सुश्रुशा करणे, त्यांच्या अवती भोवतीच्या व्यक्तींनाही योग्य प्रकारे मार्गदर्शन करणे, त्यांच्या पौष्टिक आहाराची व्यवस्था पाहणे ही होय. सद्या देशात एक लाखापेक्षा जास्त निक्षय मित्र काम करीत असल्याचे माहिती त्यानी दिली.

जर भारताला जगातील एक प्रमुख विकसीत देश म्हणवून घ्यायचे असेल त क्षय रोगाच्या निर्मुलनाला प्राधान्य देणे महत्वाचे असल्याचेही त्यानी सांगितले.

सरकारी क्षेत्रातील वेगवेगळ्या खात्याकडे समन्वय साधुन व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे या संशोधनास मिळालेले पाठबळामुळे हे शक्य झाल्याचेही डॉ. बहल यानी सांगितले. 

गोव्यात लसिकरणाच्या परिणामाचा अभ्यास केल्या नंतर भारतातील 555 जिल्ह्यापैकी 278 जिल्ह्यांमध्ये लसीकरण सुरु केले जाईल. परिणामातून आणखी सुधारणा करायची झाल्यास ती पण केली जाईल. या लसीची जागृति देशभर केली जाईल असेही त्यानी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com