

कथित कॅश फॉर जॉब प्रकरणी आरोपी पूजा नाईक हिने 'महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाच्या कार्यालयात आपण काम केल्याचा' दावा पूर्णपणे खोटा ठरला, अशी माहिती एसपी राहुल गुप्ता यांनी दिली.
मुरगाव येथील शेट्ये नेत्र रुग्णालयाच्या कॅश काऊंटरमधून २.५ लाख रुपये चोरीला गेल्याची घटना सोमवारी उघडकीस आली. फातोर्डा पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, महत्त्वाचे धागेदोरे मिळवण्यासाठी परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करत आहेत. पोलीस निरीक्षक (PI) नाथन आल्मेडा आणि पोलीस उपनिरीक्षक (PSI) सचिन पाटील यांच्या नेतृत्वाखाली पुढील तपास सुरू आहे.
सेंट फ्रान्सिस झेवियर सणाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी उत्तर गोव्याचे जिल्हाधिकारी अंकित यादव यांच्यासह उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक हरीशचंद्र माडकईकर, वाहतूक पोलीस अधीक्षक प्रबोध शिरवोईकर, अग्निशमन आणि आपत्कालीन सेवा संचालक, उपजिल्हाधिकारी (तिसवाडी), जुने गोवा पंचायतीचे प्रतिनिधी, चर्च अधिकारी आणि इतर अधिकाऱ्यांनी जुने गोव्यात भेट दिली.
यावेळी, सुरळीत वाहतूक व्यवस्था, अग्निसुरक्षा नियमांचे कठोर पालन, प्रभावी गर्दी व्यवस्थापन योजना, तसेच आपत्कालीन वाहनांना अडथळा निर्माण करणाऱ्या विक्रेत्यांना/फेरीवाल्यांना प्रवेश आणि बाहेर पडण्याच्या मार्गावरून हटवणे, आणि संपूर्ण सुरक्षा प्रोटोकॉलचे पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या.
पाली मतदारसंघात भाजप उमेदवाराच्या प्रचारादरम्यान मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली. ते म्हणाले की, "२० डिसेंबरला जिल्हा परिषद (ZP) निवडणुका आहेत आणि एक गोष्ट लक्षात ठेवा२० तारखेला आपण निश्चितच भाजपला मतदान करणार आहोत. यावेळी आपण संपूर्ण गोव्यात निर्विवाद बहुमत मिळवणार आहोत."
मात्र, पाली मतदारसंघात विक्रमी मतांनी विजय मिळवण्याची गरज असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. "आपल्याला इतके मोठे मताधिक्य मिळवायचे आहे की, आपल्या विरोधात लढणाऱ्यांना हे कळून यायला हवे की, कमळा शिवाय दुसरो पर्याय ना!, आणि हे आपल्याला कृतीतून दाखवायचे आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) उमेदवारांची पहिली यादी जाहीर केल्यानंतर आरजीपी (RGP) पक्षाचे अध्यक्ष मनोज परब यांनी तीव्र आश्चर्य व्यक्त केले आहे. परब म्हणाले, "काँग्रेसने आमच्याशी चर्चा करू, असे सांगितले असतानाही आम्हाला कोणतीही कल्पना न देता उमेदवारांची पहिली यादी जाहीर करणे, हा आमच्यासाठी धक्कादायक आहे." युतीसाठी चर्चा सुरू असताना अशी घोषणा पाहणे अनपेक्षित आहे आणि याबद्दल आम्हाला काँग्रेस नेतृत्वाशी बोलण्याची गरज आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
गोवा फॉरवर्ड पक्षाने मोठी संघटनात्मक कारवाई करत, राज्य कार्यकारिणी सदस्य आणि चिंचिणीम-देसुवाचे सरपंचफ्रँक व्हिएगस यांना पक्षाच्या प्राथमिक सदस्यत्वावरून बडतर्फ केले आहे. पक्षाच्या तत्त्वांचे, संघटनेच्या शिस्तीचे आणि एकजुटीचे उल्लंघन करणाऱ्या कृती केल्यामुळे त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली असून, हा निर्णय गोव्याच्या व्यापक हितासाठी घेण्यात आल्याचे पक्षाने स्पष्ट केले आहे.
गोवा काँग्रेसने जिल्हा परिषद (ZP) निवडणुकीसाठी आपल्या उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली आहे. या यादीमध्ये कुठ्ठाळी, कळंगुट आणि चिंबल (St. Cruz मतदारसंघातील) या तीन जागांचा समावेश आहे. विशेष म्हणजे, २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत आरजीपी पक्षाला याच जागांवर लक्षणीय मते मिळाली होती.
काँग्रेस, आरजीपी आणि गोवा फॉरवर्डची युती अधिकृतपणे जाहीर झाली नसतानाही, आरजीपी युतीमध्ये असल्याची भूमिका घेत होती. मात्र, काँग्रेसने थेट लढत असलेल्या जागांवर उमेदवार दिल्याने आरजीपीला हा मोठा धक्का मानला जात आहे. युती आणि जागावाटपावर आरजीपी अजूनही गप्प का आहे, हा प्रश्न आता उपस्थित होत आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी काँग्रेसच्या 11 उमेदवारांची पहिली यादी जाहीर.
नाणूस, वाळपई येथे एका गाईचा पाय घसरून ती सेफ्टी टँकमध्ये पडल्याची घटना घडली. घटनेची माहिती मिळताच वाळपई अग्निशमन दलाचे जवान त्वरित घटनास्थळी दाखल झाले. त्यांनी तातडीने बचावकार्य करत गाईला टँकमधून सुखरूप बाहेर काढले. अग्निशमन दलाच्या या प्रयत्नांमुळे गाईला जीवनदान मिळाले आहे.
अनमोड येथे राष्ट्रीय महामार्ग कोसळल्यामुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आलेल्या ठिकाणी एका अवजड ट्रकने बॅरिकेड्सला जोरदार धडक दिली. या अपघातात ट्रकचा चालक आणि क्लिनर किरकोळ जखमी झाले. त्यांना तातडीने १०८ रुग्णवाहिकेद्वारे उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
काँग्रेस पक्षाची उमेदवार यादीत सोमवारी रात्री ११ ते १२ उमेदवार निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. आज काँग्रेसकडून पहिल्या टप्प्यातील उमेदवार यादी जाहीर होईल, त्यात या यादीचा समावेश असणार आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.