Goa News: जेनिटोच्या जामिनावरील युक्तिवाद आता 26 नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये
Court Order
CourtCanva
Published on
Updated on

बेतोडा पंचायत क्षेत्रातील न्यु आशेवाडा येथे लोकांना पाणी नसल्याने मोठी समस्या निर्माण झाली आहे. लोकप्रतिनिधी दुर्लक्ष करत असल्याचं स्थानिकांचं म्हणणं आहे. संबंधित खात्याने दखल घेण्याची मागणी त्यांच्याकडून करण्यात आलीय

'आप'ने जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली

आम आदमी पार्टी राज्यातील आगामी जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी यादी जाहीर केली आहे.

Rama Kankonkar Attack: जेनिटोच्या जामिनावरील युक्तिवाद आता २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलला

रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या प्रकरणात मुख्य संशयित जेनिटो कार्दोझच्या जामिनावर होणाऱ्या सुनावणीला न्यायालयाने मुदतवाढ दिली असून, आता हा युक्तिवाद २६ नोव्हेंबरपर्यंत पुढे ढकलण्यात आला आहे

Margao: मडगाव पोलिसांनी यूपी आणि दिल्लीतील बेपत्ता अल्पवयीन मुलांचा शोध लावला

मडगाव पोलिसांनी मंगळवारी नावेलिम येथील त्यांच्या घरातून बेपत्ता झालेल्या दोन अल्पवयीन मुलांना शोधण्यात यश मिळवले आहे. दोन्ही मुले उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथील माहेरघरात सापडली. दिल्लीमध्ये आणखी एका बेपत्ता अल्पवयीन मुलीचा शोध लागला आहे.

Margao: मडगावात कारला आग लागून नुकसान

दक्षिण गोवा सत्र न्यायालयासमोरील रस्त्यावर गुरुवारी एका कारला आग लागण्याची घटना घडली. आगीचे नेमके कारण स्पष्ट होऊ शकले नाही. दुपारी १ वाजून ५१ मिनिटांनी ही घटना घडली. मडगाव अग्निशमन दलाच्या जवानांनी नंतर घटनास्थळी जाऊन आग विझविली. माजोर्डा येथील केरिडॉन रिबेलो यांच्या मालकीची ही कार होती.

Ponda: फोंडा येथील फार्मसीत चोरी!

फोंड्यात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एका फार्मसीत रात्री चोरट्याने प्रवेश करून सुमारे एक हजार रुपयांची रोखड पळवली. एका कौलारू चाळीत असलेल्या या फार्मसीत चोरट्याने छपरावर चढून कौले काढली आणि आत प्रवेश केला. हा प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला आहे.

रिवण येथे बेकायदेशीर डोंगरकापणीची तक्रार

सांगे नगर नियोजन कक्षेखाली येणाऱ्या रिवण या गावात सर्व्हे क्रमांक १२१/० खाली नोंद झालेल्या जागेत बेकायदेशीर डोंगरकापणी केल्याची तक्रार केपे पोलिसांत दिली आहे. याप्रकरणी नगर आणि गाव नियोजन खात्याच्या अधिकारी वृंदा फळदेसाई यांनी तक्रार दिली असून ही डोंगरकापणी २२ ऑगस्ट २०२४ पूर्वी झाल्याचे म्हटले आहे. याप्रकरणी पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. उपनिरीक्षक दिगंबर बोंद्रे याप्रकरणी तपास करीत आहेत.

Navelim: नावेलित दोन अल्पवयीन मुलांचे अपहरण

नावेलीममधील मंडप मोडी येथून १४ आणि ११ वर्षांच्या दोन मुलांचे अपहरण झाल्याची माहिती आहे. मडगाव पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे आणि सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीचा वापर करून तातडीने शोध सुरू केला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com