Goa News: बनावट आधार कार्डासह उत्तर प्रदेशचा नागरिक वाळपईत ताब्यात; वाचा दिवसभरातील घडामोडी

Goa Marathi Breaking News: राजकारण, क्रीडा, मनोरंजन आणि इतर महत्वाच्या घडामोडी मराठीमध्ये
Arrested
ArrestedDainik Gomantak
Published on
Updated on

IFFI 2025 मध्ये गोव्याची संस्कृती झळकणार; दोन गोमंतकीय चित्रपटांची Gala Premiere साठी निवड!

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी माहिती दिली की, यावर्षी IFFI 2025 मध्ये गोव्याची उत्साहवर्धक परंपरा 'कार्निव्हल' आणि 'रोमटामेल' साजरी केली जाणार आहे. पारंपरिक कलाकारांना जागतिक व्यासपीठावर ओळख मिळवून देण्यासाठी आणि गोव्याच्या समृद्ध स्थानिक संस्कृतीला अधोरेखित करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे. अभिमानाची गोष्ट म्हणजे, 'गला प्रीमियर' (Gala Premiere) विभागात गोव्यातील 'क्लॉडिया' आणि 'पायलट' या दोन चित्रपटांची निवड झाली आहे.

IFFIची जोरदार सुरुवात; Watch Video 

IFFIच्या अंतिम तयारीला जोरात सुरुवात; Watch Video

बनावट आधार कार्डासह उत्तर प्रदेशचा नागरिक वाळपईत ताब्यात

वाळपई पोलिसांनी नाणूस, सत्तरी येथील एका भंगार गोदामात मोहम्मद इरशाद (रा. उत्तर प्रदेश) याला संशयित बनावट आधार कार्डासह ताब्यात घेतले आहे. इरशाद सुमारे तीन आठवड्यांपूर्वी सुटे भाग विकण्यासाठी गोव्यात आला होता. पोलिसांनी इरशादला ताब्यात घेतले असून, पुढील तपास सुरू आहे.

SIR प्रक्रियेत गोवा राज्य देशात अव्वल; 10 दिवसांत 55% फॉर्म गोळा

गोवा राज्य S.I.R. प्रक्रियेत देशात अग्रणी ठरले आहे. मुख्य निवडणूक अधिकारी संजय गोयल यांनी दिलेल्या माहितीनुसार, ४ नोव्हेंबर २०२५ रोजी प्रक्रिया सुरू झाल्यानंतर गोव्याने अवघ्या चार दिवसांत घरोघरी ११.८५ लाख गणनेचे फॉर्म वितरित केले. विशेष म्हणजे, मागील १० दिवसांत एकूण फॉर्मपैकी ५५.३३% फॉर्म यशस्वीरित्या गोळा करण्यात आले आहेत, जी अन्य राज्यांच्या तुलनेत सर्वाधिक आकडेवारी आहे.

गोव्यात पोलिसांची मोठी पडताळणी मोहीम! 66 हजारांहून अधिक भाडेकरूंची तपासणी

गोवा पोलिसांनी या वर्षात भाडेकरू आणि कामगारांची पडताळणी करण्याची मोठी मोहीम राबवली आहे. आत्तापर्यंत ६६,४७९ भाडेकरू आणि ३३,१२३ नोकर/कामगारांची प्रत्यक्ष तपासणी पूर्ण झाली आहे. या मोहिमेअंतर्गत, अलीकडेच पश्चिम बंगालमधील १३ भाडेकरूंना प्रतिबंधात्मक अटक करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, गोवा पोलीस ॲपद्वारे आतापर्यंत १,२५० हून अधिक भाडेकरूंची पडताळणी झाली आहे.

"मुख्यमंत्र्यांची बैठक फक्त 'फोटोसेशन'साठी!" भाजपच्या रणनीतीवर व्हेन्झी व्हिएगस यांचा आरोप

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी काल घेतलेली कायदा आणि सुव्यवस्थेबाबतची बैठक केवळ 'फोटोसेशन' साठी होती, असा थेट आरोप आमदार व्हेन्झी व्हिएगस यांनी केला आहे. ते म्हणाले की, लोकांना दाखवण्यासाठी बैठका घेणे आणि प्रत्यक्षात कोणतीही ठोस कारवाई न करणे, ही भाजपची नेहमीची रणनीती आहे.

दुःखद! ड्युटीवर जाताना शिवोलीतील पोलीस अपघातात ठार

शिवोली किनारी पोलीस स्थानकात सेवा बजावणारा एक पोलीस कर्मचारी आज एका अपघातात ठार झाला. 'सागर कवच' मोहिमेवर असल्यामुळे तो दुचाकीवरून आश्वे-मांद्रे समुद्रकिनाऱ्याकडे ड्युटीवर जात होता. दरम्यान, दुचाकीवरील नियंत्रण सुटल्याने त्याची गाडी रस्त्यालगतच्या दुचाकी दुरुस्ती गॅरेजमध्ये घुसली. या अपघातात तो गंभीर जखमी झाला. त्याला तातडीने तुये इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. मांद्रे पोलिसांनी पंचनामा केला असून, पुढील तपास सुरू आहे.

विक्रम! नितीश कुमार यांनी १० व्यांदा बिहारचे मुख्यमंत्री म्हणून घेतली शपथ

नितीश कुमार यांनी आज विक्रमी १० व्यांदा बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खास उपस्थित होते. नितीश कुमार यांच्या या शपथविधीमुळे बिहारच्या राजकारणात मोठे बदल झाले आहेत.

बोणबाग बेतोडावासीयांचा इशारा! 'शिवाजी नगर'साठी नवी पाईपलाईन बसवण्याचे काम रोखणार

बेतोडा येथील बोणबाग गावात दरवर्षी पाण्याची तीव्र टंचाई जाणवत असतानाही सार्वजनिक बांधकाम विभाग (PWD) सध्या शिवाजी नगरमधील भूखंडांसाठी नवीन पाण्याची पाईपलाईन बसवण्याची तयारी करत आहे. यामुळे संतप्त झालेल्या बोणबाग येथील नागरिकांनी प्रशासनाला थेट इशारा दिला आहे की, जर त्यांच्या गावात पाण्याची समस्या कायम असताना दुसऱ्या ठिकाणी पाईपलाईन टाकली गेली, तर ते हे काम रोखतील.

गोव्याच्या डॉ. अंजनेय कामतची भरारी! NEET-PG 2025 मध्ये राज्याचा प्रथम क्रमांक

गोवा मेडिकल कॉलेजचे डॉ. अंजनेय  जयंत कामत यांनी NEET-PG २०२५ परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक (State Rank 1) मिळवून गोव्याचा मान वाढवला आहे. राष्ट्रीय स्तरावर त्यांचा क्रमांक २१२ (AIR 212) आला आहे. त्यांच्या या यशामुळे गोव्यातील वैद्यकीय शिक्षण क्षेत्राला अभिमान वाटत असून, ते राज्यातील वैद्यकीय विद्यार्थ्यांसाठी प्रेरणास्रोत ठरले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com