

गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत सायंकाळी मतदान संपण्यापूर्वीच्या आकडेवारीनुसार मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळत आहे. दुपारी ४ वाजेपर्यंतची आकडेवारी समोर आली असून, उत्तर गोव्यातील केरी मतदारसंघाने बाजी मारली आहे. येथे सर्वाधिक ८२.६४% इतक्या विक्रमी मतदानाची नोंद झाली आहे.
ग्रामीण भागातील जागरूक मतदारांनी सकाळपासूनच मोठ्या संख्येने केंद्रांवर गर्दी केली होती.दुसरीकडे, दक्षिण गोव्यातील नावेली मतदारसंघात मतदानाचा वेग सर्वात कमी दिसून आला. येथे ४ वाजेपर्यंत केवळ ४९.२०% मतदान झाले आहे.
लोकशाहीच्या उत्सवात वयाचे बंधन नसते, हे आज सत्तरी तालुक्यातील ब्रह्मकर्माळी येथील ९३ वर्षीय सावित्री खाडीलकर यांनी सिद्ध करून दाखवले. नगरगाव जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी त्यांनी आज उत्साहाने मतदान केंद्रावर जाऊन आपला मतदानाचा हक्क बजावला. शारीरिक मर्यादांवर मात करत त्यांनी नोंदवलेला हा सहभाग आजच्या तरुण पिढीसाठी प्रेरणादायी ठरला आहे.
गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी सकाळपासूनच मतदारांमध्ये मोठा उत्साह दिसून येत आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, सकाळी ८ ते दुपारी २ या वेळेत एकूण ४८.७६% मतदानाची नोंद झाली आहे. बॅलेट पेपरद्वारे होत असलेल्या या मतदानात आतापर्यंत ५०% च्या जवळ पोहोचलेली ही आकडेवारी लोकशाहीसाठी सकारात्मक संकेत मानली जात आहे. विशेषतः पर्ये, साखळी आणि शिरोडा यांसारख्या ग्रामीण पट्ट्यात मतदानाचे प्रमाण शहरी भागापेक्षा अधिक दिसून येत आहे.
या मतदारसंघात काँग्रेस आणि आम आदमी पक्ष यांच्यात थेट आणि अटीतटीची लढत पाहायला मिळत आहे. ही निवडणूक काँग्रेससाठी 'प्रतिष्ठेचा विषय' बनली असून, बाणावलीवर पुन्हा एकदा काँग्रेसचे वर्चस्व निर्माण करण्यासाठी पक्षाने कंबर कसली आहे.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानासाठी आज संपूर्ण गोव्यात उत्साहाचे वातावरण असताना, पर्ये मतदारसंघाच्या आमदार डॉ. दिव्या राणे यांनी आपल्या मतदान केंद्रावर जाऊन मतदानाचा हक्क बजावला. यावेळी त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभागी होत नागरिकांनाही मोठ्या संख्येने बाहेर पडून मतदान करण्याचे आवाहन केले.
मगोपचे सर्वेसर्वा आणि वीजमंत्री सुदिन ढवळीकर यांनी जिल्हा पंचायत निवडणुकीच्या मतदानाच्या दिवशी मतदारांना एक अनोखे आवाहन केले आहे. धारबांदोडा येथे आपण हाती घेतलेला 'गुप्त प्रकल्प' रखडू नये, यासाठी मतदारांनी मोठ्या संख्येने बाहेर पडून मगोपच्या उमेदवारांना विजयी करावे, असे त्यांनी म्हटले आहे. या विधानामुळे राजकीय विश्लेषकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून, हा खरोखरच एखादा 'गुप्त प्रकल्प' आहे की सुदिन ढवळीकर यांना 'मलनिस्सारण प्रकल्प' (Sewerage Project) म्हणायचे होते, यावर चर्चा रंगली आहे.
कोणाचेही नाव न घेता ढवळीकर म्हणाले की, एक व्यक्ती आपल्या मगोप कार्यकर्त्यांविरुद्ध आणि उमेदवारांविरुद्ध काम करत आहे. आपल्या तिन्ही उमेदवारांच्या विजयाबद्दल त्यांनी खात्री व्यक्त केली असून, विकासकामांची गती कायम राखण्यासाठी मगोपला साथ देण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.
गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीच्या पहिल्या दोन तासांतील मतदानाची आकडेवारी समोर आली असून, विविध मतदारसंघांत संमिश्र प्रतिसाद पाहायला मिळत आहे. सकाळी ८ ते १० या वेळेत पाळीमतदारसंघात सर्वाधिक २०.६६% मतदानाची नोंद झाली आहे, जिथे मतदारांनी सकाळपासूनच मोठा उत्साह दाखवला.
दुसरीकडे, ताळगाव मतदारसंघात मतदानाचा वेग काहीसा मंदावलेला दिसून आला. येथे सर्वात कमी म्हणजे केवळ ११.१५% मतदान झाले आहे. संपूर्ण गोव्याची सरासरी १५.११% इतकी असून, जसजसा दिवस पुढे सरकेल तसतसा मतदानाचा टक्का वाढण्याची शक्यता निवडणूक आयोगाकडून वर्तवण्यात आली आहे.
मोरजी जिल्हा पंचायत मतदार संघातून भाजप युतीचे उमेदवार विजयी होतील आमदार जीत आरोलकर यांचा दावा,मतदानासाठी गर्दी
मये जिल्हा पंचायत मतदारसंघात दुपारी 12 वाजेपर्यंत सरासरी 40 टक्के मतदान. सकाळी दहानंतर मतदानाला प्रतिसाद.
गोवा जिल्हा पंचायत निवडणुकीत आज मतदान होत असताना, साखळी मतदारसंघातील सुर्ल येथील मतदारांनी एका महत्त्वाच्या मुद्द्यावरून आपली नाराजी व्यक्त केली आहे. विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीत ईव्हीएम (EVM) मशीनवर 'नोटा' (NOTA) हा पर्याय उपलब्ध असतो, परंतु जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी वापरल्या जाणाऱ्या बॅलेट पेपरवर हा पर्याय नसल्याचे समोर आले आहे.
व्यातील ५० जिल्हा पंचायत मतदारसंघांसाठी आज (२० डिसेंबर) सकाळी ८ वाजल्यापासून मतदानाला सुरुवात झाली आहे. सकाळी ८ ते १० या पहिल्या दोन तासांच्या कालावधीत संपूर्ण गोव्यात १५.११% मतदानाची नोंद झाली आहे. यामध्ये उत्तर आणि दक्षिण अशा दोन्ही जिल्ह्यांतील मतदारांचा समावेश आहे.
कुंभारजुवेचे आमदार राजेश फळदेसाई यांनी आज आपल्या कुटुंबासह जिल्हा पंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. खोर्ली जिल्हा पंचायत मतदारसंघातील मतदान केंद्रावर उपस्थित राहून त्यांनी लोकशाहीच्या या उत्सवात सहभाग नोंदवला.
जिल्हा पंचायत निवडणुकीच्या उत्सवात मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी आज कोठंबी येथील मतदान केंद्रावर सहकुटुंब उपस्थित राहून आपला मतदानाचा हक्क बजावला. त्यांच्यासोबत पत्नी सुलक्षणा सावंत आणि कन्या पार्थिवी सावंत होत्या. विशेष म्हणजे, पार्थिवी यांनी आज पहिले मतदान करून लोकशाहीच्या प्रक्रियेत सहभाग नोंदवला.
डिचोलीत जिल्हा पंचायत निवडणुकीसाठी मतदानास प्रारंभ. सकाळपासूनच समाधानकारक प्रतिसाद. मेणकुरे मतदान केंद्रावर आमदार डॉ. चंद्रकांत शेट्ये यांनी बजावला मतदानाचा हक्क.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.